money plant  Esakal
संस्कृती

Vastu Tips : कधी कधी मनी प्लांट लावल्याने तुम्हाला नफ्याऐवजी तोटाही सहन करावा लागु शकतो...

साधारणपणे आपल्याकडे प्रत्येक घरात मनी प्लांट पाहायला मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips for Money Plant: असे मानले जाते की घरात मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता उर्जा येते आणि घरात धनसंपदा टिकून राहते. साधारणपणे आपल्याकडे प्रत्येक घरात मनी प्लांट पाहायला मिळतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे अशी समाजमान्यता आहे की, ज्या घरात मनी प्लांट लावला जातो तिथे धन-समृद्धी आणि सुख-समृद्धी दोन्ही एकाच वेळी वास करते. 

आपल्या वास्तूशास्त्रातही मनी प्लांटला शुभ झाड मानले जाते. काही ठिकाणी तर मनी प्लांटला आशीर्वाद देणारे झाड देखील म्हटले जाते. वास्तूनुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते आणि मनी प्लांट घरात लावल्यामुळे कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही असा लोकांचा समज आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की अनेक वेळा मनी प्लांट लावल्याने तुम्हाला नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागतो. 

आजच्या लेखात आपण वास्तूनुसार मनी प्लांटशी संबंधित काही नियम जाणून घेऊ या..

1) वास्तूनुसार घरामध्ये मनी प्लांट लावताना त्याची पाने चुकूनही जमिनीला लागू नयेत याची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी मनी प्लांटची वेल दोरीच्या किंवा काठीच्या साहाय्याने वर बांधून घ्यावी. कारण समजा चुकून जरी तुम्ही लावलेल्या मनी प्लांटच्या पानांचा स्पर्श जमिनीला झाला तर ते तुमच्या धन आणि समृद्धीमध्ये अडथळा आणु शकतात.

2) तुमच्या घरातील मनी प्लांट हा चांगला बहरलेला असला तर ते शुभ लक्षण मानल्या जाते. पण जर तुमच्या घरातील मनी प्लांट हा सुकलेला असेल तर तो लगेच काढून टाकावा. कारण सुकलेला किंवा पिवळा पडलेल्या मनी प्लांटमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

3) तुमच्या घरात सदैव लक्ष्मी प्रसन्न रहावी असे तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुमचा घरातील मनी प्लांट चुकूनही बाहेरच्या व्यक्तीला लावण्यासाठी देऊ नये. असे केल्याने तुमच्या घरातील मनी प्लांटचे शुभ आशीर्वाद निघून जाऊ शकतात आणि त्यामुळे मग तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

4) वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांट योग्य दिशेला लावावा. वास्तूनुसार मनी प्लांट कधीही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावू नये. आग्नेय दिशा ही मनी प्लांट लावण्यासाठी शुभ मानली जाते.

5) वास्तूनुसार मनी प्लांटचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि त्यामुळे मनी प्लांट लावण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे तुम्हाला जर मनी प्लांट शुक्रवारीच लावावा पण घरातील जुणा मनी प्लांट

शुक्रवारी तोडू नये.

( या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ त्याची पुष्टी करत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT