संस्कृती

Vastu Tips : पैशाच्या तुटवड्याने हैराण आहात? हे तीन सोप्पे उपाय करा

आनंदी जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा

सकाळ डिजिटल टीम

आरामदायी आणि आनंदी जीवनाची कोणाला इच्छा नसते. यासाठी लोक खूप कष्ट करतात आणि घाम गाळतात. असे असूनही काही लोकांना चांगले परिणाम मिळत नाहीत. आनंदी जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि तो कमावला तरी टिकलाही पाहिजे.

अनेकदा घरात पैसा येतो पण टिकत नाही, आपण सतत पैशाच्या तुटवड्याने हैराण असतो. यासाठी घराची वास्तू योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये वास्तुदोष असेल तर घराची आर्थिक स्थिती नेहमीच खराब राहते. अशा परिस्थितीत त्या चुका ओळखून सुधारणे गरजेचे आहे. हे तीन खूप सोप्पे उपाय दररोज केल्याने आपण लक्ष्मी देवी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहते.

१. दिवा

घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या दरवाज्यावर दिवा लावावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात वास होतो.

२. स्वयंपाकघर

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बाटली भरून स्वयंपाकघरात ठेवा. असे केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते आणि पैशाची समस्याही दूर होते. यासोबतच घराची आर्थिक स्थितीही मजबूत होते.

३. बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेल्या बादलीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा.

TAGS

Vastu Tips, Good Luck Tips, Vastu Tips for Money, Pleased Mata Lakshmi, Goddess Lakshmi, Kitchen

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT