Vastu Tips Sakal
संस्कृती

Vastu Tips : तुम्हीदेखील जेवताना ताटात तीन पोळ्या घेता? तर, आताच...

हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला काही विशिष्ट समजुती आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : शास्त्रात अनेक गोष्टी करू नये असे सांगण्यात आले आहे. एवढेच काय तर, आपल्यापैकी अनेकांच्या घरात ज्येष्ठांना सांगताना ऐकले असेल की, जेवताना ताटामध्ये तीन पोळ्या वाढू नये. तसेच प्रसादातही तीन फळं दिली जात नाही.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

असं न करण्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत अनेकांना माहिती नाही. हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला काही विशिष्ट समजुती आहेत, ज्या आपल्याला आपल्या वडिलांकडून ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला ताटात का तीन पोळ्या वाढू नये याबाबत सांगणार आहोत.

ताटात का वाढू नये तीन पोळ्या?

असे मानले जाते की, ताटात तीन पोळ्या वाढणे म्हणजे मृत व्यक्तीला जेवण दिल्या सारखे होते. अनेकदा तेराव्या विधीत मृत व्यक्तीसाठी काढलेल्या जेवणामध्ये 1 किंवा तीन पोळ्या ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. अशा परिस्थितीत जिवंत व्यक्तीच्या जेवणात तीन पोळ्या देणे अशुभ मानले जाते.

तीन पोळ्या वाढण्याचे तोटे

ज्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या वाढल्या जातात. त्या व्यक्तीच्या मनात दुस-यांशी शत्रुत्वाची भावना निर्माण होते. केवळ पोळ्याच नव्हे तर, तीन लाडू, तीन फळे ताटात ठेवू नयेत. असे केल्याने व्यक्तीचे वयही कमी होते.

अशुभ मानला जातो तीन क्रमांक

प्राचीन काळापासून, पूजेच्या ग्रंथात देखील 3 क्रमांक अशुभ मानला गेला आहे. पूजेमध्ये किंवा प्रसादात 3 क्रमांकामध्ये कोणत्याही गोष्टी दिल्या जात नाही.

काय सांगते विज्ञान?

विज्ञानाच्यादृष्टीने अशी कोणतीच मोजदाद नाही, पण सामान्य माणसाला 1 वाटी वरण, भात आणि भाजीसोबत 2 पोळ्या सेवन करणे पुरेसे आहे, पण सामान्य माणसाला एक वाटी वरण, भात आणि भाजीसोबत दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे, अशा स्थितीत तिसरी पोळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT