Spiritual Facts esakal
संस्कृती

Spiritual Facts : कर्मकांड नव्हे तर स्वतःच्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याला ओळखणे म्हणजे अध्यात्म

भगवत गीतेत श्रीकृष्णाने उलगडले अद्भूत ज्ञान.

सकाळ डिजिटल टीम

श्रुती आपटे

What Is Spirituality In Bhagavat Geeta : हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत कोणाला म्हणायचे? अधीदैव कशाला म्हणतात? असे अनेक प्रश्न अध्यात्माच्या अभ्यासकांना पडत असतात. त्याचं अगदी सोप्या शब्दात उत्तर श्रीकृष्णाने भगवत गीतेत दिले आहे.

गीतेचा आठवा अध्याय अक्षरब्रह्माच्या वर्णनाचा आहे. मागच्या अध्यायात श्रीकृष्णांनी उल्लेख केला होता की, आयुष्यभर जे सातत्याने ब्रह्म, अध्यात्म, कर्म इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपडतात, सतत चिंतनात मग्न असतात ते आयुष्याच्या शेवटी ईश्वराला, श्रीकृष्णाला जाणतात. मृत्यूसमयी भगवंताचेच स्मरण करतात.

हे ऐकून अर्जुनाची जिज्ञासा जागृत होते आणि तो ब्रह्म अध्यात्म या विषयी श्रीकृष्णांना विचारतो. श्रीकृष्णाने त्यांच्या शंकांचे निरसन कसे केले आहे, ते पाहूया. ब्रह्म म्हणजे काय? अक्षर असलेले, म्हणजेच कधीच नाश न पावणारे आणि सतत विस्तार पावणारे सर्वश्रेष्ठ सर्व जगाला व्यापून असलेले चैतन्यमय तत्त्व म्हणजे ब्रह्म.

अध्यात्म म्हणजे ‘स्व-भाव’. प्रत्येक प्राणिमात्रांच्या शरीरात जीव रूपाने राहणारा आत्मा, जो ब्रह्माप्रमाणेच अविनाशी आहे तो म्हणजे अध्यात्म. कर्म म्हणजे काय? या ब्रह्मापासून चराचर सृष्टीची, विविध पदार्थांची उत्पत्ती करण्याचे ईश्वराचे कार्य म्हणजेच कर्म. अधिभूत, म्हणजे उत्पत्ती आणि विनाश असणारे सर्व पदार्थ.

ब्रह्म ‘अक्षर’ आहे, तर अधिभूत म्हणजे चराचर नामरूपात्मक सृष्टी ‘क्षर’ म्हणजेच नाशवंत आहे. सर्व सजीव, निर्जीव पदार्थात प्रकाशणारे चैतन्य म्हणजेच अधिदैव. सर्व यज्ञांचा अधिपती हा अधिअज्ञ आहे. येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘देहभृतांवर’ असे संबोधतो, कारण प्राण्यांमधील सर्वांत विकसित मनुष्यच असतो. सर्व मनुष्यामध्ये अर्जुनच श्रेष्ठ आहे, असे श्रीकृष्ण म्हणतो. अर्जुनाचा निर्मळ स्वभाव, श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि जिज्ञासा त्याला भगवंताच्या प्रेमाची आणि ज्ञानाची प्राप्ती करून देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजेंना मारलं कुणी? पद्मसिंहांच्या लेकानं १९९० ते २००९ पर्यंतचं राजकारण काढलं बाहेर, षडयंत्र असल्याचा आरोप

Railway Fine: बिनतिकीट प्रवाशांवर मोठा दणका! नियम मोडल्यास दुप्पट पैसे आकारणार; रेल्वे प्रशासनाकडून नवे दंड जाहीर

बरं झालं मी 'वाजले की बारा' नाही केलं नाहीतर... अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; अमृता खानविलकरचे चाहते संतापले, म्हणाले- मॅडम

Flying Flea C6 : बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच; 154KM रेंज, रॅपिड चार्जिंग अन् किंमत फक्त...

Latest Marathi Live Updates:श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे 17 वर्षीय तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT