What is the Connection Between Sage Vyasa and Gautam Buddha on Guru Purnima sakal
संस्कृती

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचा ऋषी व्यास आणि गौतम बुद्धांशी काय आहे संबंध? जाणून घ्या सविस्तर

What is the relation between Guru Purnima and Sage Vyasa: आपण अनेकांनी आजवर अशा आदर्श गुरु शिष्याच्या जोडीच्या कथा ऐकल्याही असतील. गुरु पौर्णिमेला आपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. गुरु पौर्णिमा आषाढ शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते आणि हा दिवस गुरुंच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.

  2. महर्षी वेदव्यासांचा जन्म या दिवशी झाला असल्यामुळे या दिवसाला वेदव्यास जयंती आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते.

  3. गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन याच दिवशी दिले होते, त्यामुळे हा दिवस बौद्ध धर्मात बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा होतो.

गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम....  ग.दी माडगुळकरांच्या या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. हिंदू धर्मामध्ये गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्नान आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरू पौर्णिमेला विशेष स्नान आहे. पुराणांपासून गुरु शिष्याच्या नात्याच्या अनेक कथांचा उल्लेख आढळतो. 

आपण अनेकांनी आजवर अशा आदर्श गुरु शिष्याच्या जोडीच्या कथा ऐकल्याही असतील. गुरु पौर्णिमेला आपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजर केली जाते. या पौर्णिमेला वेद पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा देखील म्हंटलं जातं.  या दिवशी आपल्याला जीवन जगण्याचं ज्ञान देणाऱ्या, प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरुंचे आभार मानले जातात आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. यंदाच्या वर्षी गुरु पौर्णिमा नेमकी कधी आहे हे पाहुयात. 

गुरू पौर्णिमा तिथी आणि पूजा मुहूर्त

पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात १० जुलै २०२५ रोजी पहाटे १:३७ वाजता होईल आणि ती ११ जुलै २०२५ रोजी रात्री २:०७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीप्रमाणे, गुरुपौर्णिमा १० जुलै २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देशभरात भक्तिभावाने गुरूंचा सन्मान आणि पूजन केले जाईल.

गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 2025 मध्ये 10 जुलै रोजी आहे. पौर्णिमा तिथी 9 जुलै रोजी रात्री 8:10 वाजता सुरू होईल आणि 10 जुलै रोजी संध्याकाळी 6:32 वाजता समाप्त होईल. त्यामुळे, 10 जुलै रोजी सूर्योदयापासून गुरुपूजेसाठी शुभ वेळ आहे. 

वेद व्यास जयंती

पुराणातील कथेनुसार महर्षि वेद व्यास यांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. यामुळेच या पौर्णिमेला वेदव्यास जयंती असंही म्हटलं जातं. महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली होती. गुरु पौर्णिमेच्या दिवशी वेद व्यास यांची देखील म्हणूनच पूजा केली जाते.

गुरु पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हंटलं जातं?

गुरु पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे अनुयायी बुद्ध पौर्णिमा देखील साजरी करतात. यामागे खास कारण आहे. राजकुमार असलेल्या सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांनी २९व्या वर्षी जीवनाचं सत्य शोधण्यासाठी घर सोडलं. ६ वर्ष बोधीवृक्षाखाली बसून त्यांनी तप केलं. 

ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध पायी चालत सारनाथला गेले इथे त्यांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना प्रवचन दिलं. म्हणूनच या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये गुरु पौर्णिमेचा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. 

गुरु पौर्णिमेच्या दिवशी विविध मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये साधु संतांची आणि गुरुंची पूजा केली जाते आणि गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

FAQs

  1. गुरु पौर्णिमा 2025 मध्ये कधी साजरी केली जाते?
    गुरु पौर्णिमा 2025 मध्ये 10 जुलै रोजी गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे.

  2. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात?
    या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता, म्हणून याला व्यास पौर्णिमा म्हणतात.

  3. गौतम बुद्धांचा गुरु पौर्णिमेशी काय संबंध आहे?
    गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये आपल्या शिष्यांना याच दिवशी पहिले प्रवचन दिले होते.

  4. गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते?
    या दिवशी गुरुंची पूजा, साधू-संतांचे आशीर्वाद, धार्मिक विधी आणि दानधर्म केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT