What is the importance and benefits of offering argha to the sun  Esakal
संस्कृती

Culture : सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्व व फायदे काय आहे?

सूर्य उपासनेसोबतच आदित्यस्त्रोत्र देखील पाठ करणं आवश्यक आहे

सकाळ डिजिटल टीम

सूर्य देवतेची मनोभावे पूजा केल्यास आणि त्यास अर्घ्य अर्पण केल्यास आपल्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील. सूर्य उपासनेसोबतच आदित्यस्त्रोत्र देखील पाठ करणं आवश्यक आहे. कारण की, ते देखील लाभदायक आहे. जर आपल्या कुंडलीत सूर्य जर कमकुवत स्थानी असेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित यश हे मिळतच नाही. हिंदू धर्मानुसार सूर्याला देवत्व प्रदान करण्यात आलं आहे.

रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्य मंत्राचा जप करा. सूर्याची उपासना केल्याने बळ, बुद्धी, विद्या, वैभव, तेज आणि पराक्रम याची आपल्याला प्राप्ती होते असं शास्त्रात म्हटलं आहे. सूर्य देवतेची उपासना करण्यासाठी राष्ट्रवर्द्धन मंत्र देखील आहे. 

● सुर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून शुभ फळ देणारा सत्त्वप्रधान आहे. हिंदू धर्मात सूर्य उपासनेचे खूप महत्त्व सांगितले जाते.

● सुर्योपासना फार प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली आहे.

● हिंदू पुराणात सुर्याचे वर्णन देवता म्हणून केले जाते. वेदांमध्ये असीम ऊर्जेचा श्रोत, तेजाचे कोठार अशा शब्दांनी सुर्याला गौरविले आहे.

● आपले ऋषी मुनी म्हणतात सर्व जगताचा आत्मा म्हणजे सुर्य होय.

● ज्याला चांगले आरोग्य पाहिजे, त्याने सुर्योदयापूर्वीच उठून आंघोळ करून उगवत्या सुर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते.

● सुर्याला अर्घ्य (जल) अर्पण करताना सुर्यमंत्राचा जप करावासुर्योपासना केल्यास मनुष्य आपत्तीतून मुक्त होतो.

● सूर्योपासनेविषयी अगस्तिऋषी सांगतात, भीषण संकटात, भयंकर परिस्थितीत, निर्जन अरण्यात, घोर प्रसंगात, महासागरात सुर्याचे नामस्मरण (श्री आदित्याय नमः।) केल्यास मानव आपत्तीतून सहज मुक्त होऊ शकतो.

● प्रतिदिन सुर्यदर्शन करावे. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणार्‍या या देवाची ही शक्ती ओळखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

SCROLL FOR NEXT