Nag Panchami 2022 Esakal
संस्कृती

Nag Panchami 2022 : आजच्या काळात नागपंचमी साजरी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी ?

यंदा 2 ऑगस्टला शिव आणि सिद्धी अशा दोन्ही योगात नागपंचमी साजरी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

यंदा 2 ऑगस्टला शिव आणि सिद्धी अशा दोन्ही योगात नागपंचमी साजरी होणार आहे.

चला तर मग आता बघू या आजच्या काळात नागपंचमी साजरी करतांना आपण सर्वांनी कोणती विशेष काळजी घ्यावी ?

● नागपंचमीच्या दिवशी खर्‍या सापाची किंवा नागाची पूजा करू नये, प्रतिकात्मक स्वरुपात चित्राची किंवा शिल्पाची पूजा करावी.

● भारताच्या वाइल्ड लाइफ प्रोटेक्षन कायद्यानुसार सापांना पकडणे, पकडून ठेवणे, वापरणे, त्यांना त्रास देणे किंवा मारणे हा गुन्हा आहे.

● सापांना बऱ्याच ठिकाणी पिशवीत श्वास कोंडून पकडले जाते. लहानशा बरणीतमध्ये जिथे त्यांना अंग मोकळेही करता येत नाही अश्या ठिकाणी ठेवले जाते व उपासमार केली जाते. त्यांचे दात दुष्टपणे तोडले जातात, गारूडीलोक त्यांची तोंडे शिवून टाकतात. ज्याने नागांना अति वेदना होतात. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या लोकांपासुन आपण दुर राहावे.

● नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध पाजणे टाळावे कारण दूध हे सापाचे अन्न नाही. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते. डिसेंट्री होऊन मृत्यू पण ओढवू शकतो.

● नागपंचमीला जिवंत सापाची पूजा करुच नये.कारण पूजेत वापरले जाणाऱ्या कुंकू जर का सापांच्या डोळ्यात गेल्याने साप आंधळा होतो. कारण शेवटी ते कुंकू एक केमिकलच आहे.

● गारुडी जो सापाचा पुंगीवर नाच दाखवतो तो नाच नसून , गारुड्याच्या अ‍ॅक्क्षनची भीती वाटल्याने सापाने केलेल्या हालचाली असतात. वास्तविक पाहिले तर साप नाचत नाही. त्यांना गारुडी हे थ्रेटनिंग वाटतात.

● जर का तुम्ही सापाच घर असलेल्या वारुळाची पूजा करणार असाल तर त्या वारुळावर भसाभसा दूध किंवा पाणी टाकू नका, वारुळावर दिवा,अगरबत्ती किंवा धूप लावू नका.

● नागपंचमीच्या दिवशी जवळच्या एखाद्या सर्पमित्रांला बोलवून सापांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे तुमच्या मनात सापाविषयीचे गोडगैरसमज दुर होण्यास मदत होईल. आणि सापांविषयी खरी माहिती तुम्हाला कळेल.

● नागपंचमीला खूप गावात पत्ताचे डाव बसवले जातात .आणि एकदा तुम्ही त्या डावात बसले तर तुमचे प्रचंड पैसे त्या डावावर लागु शकतात. त्यामुळे अशा गोष्टीपासून दुर राहावे.

● नागपंचमीविषयी या काही सकारात्मक गोष्टी नव्याने शिकणे काळाची गरज झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT