Importance of Nag Panchami in Hinduism: श्रावण महिना सुरू झाला की, हिंदू धर्मातील सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे नाग पंचमी. या सणाला धार्मिक दृष्टिकोनातून खास महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नाग देवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने नाग देवतेची पूजा केल्याने दुःख दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि ग्रहदोष कमी होतात. यंदा या दिवशी शुभ योगही बनत असल्यामुळे नाग पंचमीचा दिवस अधिक शुभ मानला जात आहे.
नाग पंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते. मात्र काही राज्यांमध्ये ही पंचमी कृष्ण पक्षातही साजरी केली जाते. तसेच यंदा या दोन्ही दिवशी शुभ योग बनणार आहेत.
कृष्ण पक्ष पंचमी: 15 जुलै 2025 रोजी सूर्योदयापासून सुरू होईल. या दिवशी काही ठिकाणी नाग पंचमी साजरी केली जाईल. या दिवशी सौभाग्य योग तयार होत आहे.
शुक्ल पक्ष पंचमी: 28 जुलै रोजी रात्री 11:25 वाजता सुरू होईल आणि 29 जुलै 2025 रोजी रात्री 12:47 वाजता समाप्त होईल. त्यामुळे काही ठिकाणी नाग पंचमी 29 जुलै रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिव योग तयार होत आहे.
या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
घरातील पूजास्थळी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन व्रत संकल्प घ्यावा.
घराच्या प्रवेशद्वाराजवळ खडूनेकिंवा कोळशाने नागदेवतेचा आकृती तयार करावी. शक्य नसेल तर नागदेवतेचा फोटो लावून पूजन करता येते.
नागदेवतेस दूध, जल अर्पण करून धूप, दीप, नैवेद्य समर्पित करावा.
शेवटी आरती करून नाग पंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी.
काही ठिकाणी या दिवशी शेताजवळ किंवा मोकळ्या ठिकाणी दूध ठेवण्याची प्रथा आहे, जिथे साप येण्याची शक्यता असते.
याच दिवशी खीर आणि साखरभातसारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.