1 May | Maharashtra Din | Kamgar Din  sakal
संस्कृती

Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Labour Day 2025: 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र का साजरे केले जातात, यामागचा ऐतिहासिक संदर्भ जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Meaning Of Labour Day and Its Global Celebration: दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सांस्कृतिक, शासकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शाळा, कॉलेजेस, सरकारी संस्था या ठिकाणी विशेष परेड, संस्कृतिक कार्यक्रम, झेंडावंदन आयोजित केले जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरात पसरलेले सर्वच महाराष्ट्रीयन लोक मोठ्या उत्साहात, आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात. चला तर मग महाराष्ट्र दिनाचा आणि त्याचसोबत असलेल्या कामगार दिन याबद्दल जाणून घेऊया.

महाराष्ट्र दिन

1950 च्या दशकात भाषावार राज्यांच्या निर्मितीसाठी आंदोलनं जोर धरू लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली.  मात्र मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की नाही, यावरून मोठा वाद निर्माण झाला.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो आंदोलकांनी एकत्र येत सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला.

या घटनेत 106 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. हे हुतात्मे आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.

कार्यक्रम आणि सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शपथविधी समारंभ आणि अभिवादन सोहळे आयोजित केले जातात. सरकारी कार्यालये आणि शाळांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

कामगार दिन

महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे.1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

कामगार दिनाचा इतिहास

1886 साली कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येत अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यावेळी अनेक कामगारांना दिवसाचे 15-16 तास काम करायला लावले जात होते, मात्र त्याच्या मोबदल्यात ना पुरेसा पगार मिळायचा, ना सुट्टी. या परिस्थितीला कंटाळून कामगारांनी एकत्र आंदोलन केलं आणि आठ तास कामाचा दिवस, योग्य वेतन व सुट्टी यांची मागणी केली.

या लढ्याचं प्रतीक म्हणून 1989 मध्ये मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एक ठराव मंजूर केला. या ठरावात कामगारांसाठी दिवसातील 8 तासांपेक्षा अधिक काम न करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर कामगारांच्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जाऊ लागला.

भारतात कधी साजरा झाला पहिला कामगार दिन ?

भारतामध्ये कामगार दिन पहिल्यांदा 1923 साली चेन्नईमध्ये साजरा करण्यात आला. ‘लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडिया’ने या दिनाचं आयोजन केलं होतं. त्या वेळी नामांकित कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनी सरकारकडे मागणी केली की, कामगारांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी 1 मे हा दिवस अधिकृत राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्य केला जावा. आज हा दिवस ‘कामगार दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून ओळखला जातो, जो कामगारांच्या संघर्षाची आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT