Margashirsha Purnima 2023  esakal
संस्कृती

Margashirsha Purnima : मार्गशीर्ष पौर्णिमेला का आहे एवढं महत्व? जाणून घ्या दिनविशेष, मुहूर्त अन् लाभ...

मार्गशीर्ष महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती...

सकाळ डिजिटल टीम

Margashirsha Purnima 2023: हिंदू धर्मात, मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. ह महिना पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. यावेळी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हणजेच रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमा साजरी केली जाईल. पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती. या दिवशी सकाळी उठून केलेले स्नान, दान आणि तपश्चर्या अत्यंत लाभदायक ठरते.

मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष पौर्णिमेला उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. पूर्वीच्या काळी या दिवशी पवित्र नदी, ओढा किंवा तलावात तुळशीच्या मुळाच्या मातीने स्नान करण्याची प्रथा होती. असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान इतर पौर्णिमेच्या तुलनेत ३२ पट अधिक फळ देते, म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगण्याची परंपरा आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

मार्गशीर्ष पौर्णिमेचा मुहूर्त हा शनिवारी रात्री ९ वाजून २९ मिनिटांपासून सुरू झाला आहे पण आपण सूर्यभागी दिनविशेष पाळत असल्याने पौर्णिमा रविवारी आहे. ही पौर्णिमा रविवारी रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी संपेल.

मार्गशीर्ष पौर्णिमा पूजा विधी

या दिवशी लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करा. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावा आणि घरासमोर रांगोळी काढा. पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा आणि शक्य असल्यास शेणाने सारवा. तुळशीला पाणी द्या. गंगेचे पाणी आणि कच्चे दूध मिसळा आणि त्याने भगवान श्रीविष्णू, गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवींचा अभिषेक करा. यानंतर देवाला अबीर, गुलाल, चंदन, अक्षता, फुले, तुळशीची पाने अर्पण करा. सत्यनारायणाची कथा वाचा आणि पूजेत सामील असलेल्या सर्व ज्येष्ठांकडून आशीर्वाद घ्या आणि सर्वांना प्रसाद द्या.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करणे ठरते फलदायक

1. सकाळी लवकर आणि सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करा.

2. पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करा.

3. या दिवशी उपवास अत्यंत भक्ती, श्रद्धा आणि भक्तिभावाने करावा. तसेच, हे व्रत फलदायी होण्यासाठी हे आवश्यक आहे.

4. या दिवशी दानधर्म अवश्य करावा.

5. कांदा, लसूण, मांस, मासे, अल्कोहोल इत्यादी पदार्थांपासून दूर राहा.

6. जर तुम्ही उपवास करत असाल तर दुपारी चुकूनही झोपू नका.

7. पूजेदरम्यान देवाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा.

8. ब्राह्मणाला अन्न आणि आवश्यक वस्तू दान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT