Vat Purnima 2022 सकाळ
संस्कृती

Vat Purnima 2022: यमराजाकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती?

वटसावित्री साजरी करण्यामागे काय पौराणिक कथा आहे? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

आज वटपौर्णिमा. तुम्हाला माहिती आहे का वटपौर्णिमा साजरी करण्यामागे नेमका काय इतिहास आहे? याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. (why women worship the banyan tree on vat purnima, read mythology story)

पौराणिक कथा -

अस म्हणतात की फार पुर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करायचा. त्याला एक सुंदर मुलगी होती तीचे नाव होतं सावित्री. सावित्री हळूहळू मोठी होऊ लागली. पुढे ती विवाहयोग्य झाल्यावर अश्वपती राजाने तिला तीचा जोडीदार निवडण्याची परवानगी दिली आणि सावित्रीने सत्यवानाची निवड केली.

सत्यवान हा शाल्व राज्यातील धृमत्सेन राजाचा मुलगा होता. धृमत्सेन राजा आणि त्याची राणी हे दोघेही अंध होते. त्यांचा मुलगा सत्यवान अल्पायुषी आहे हे नारदमुनीला माहिती असल्यामुळे त्यांनी सावित्रीला तिच्या निर्णयापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तीने सत्यवानाशीच विवाह केला.

सावित्रीच्या सासरला शत्रुसोबत युध्दात अपयश आल्याने ते आपल्या परिवारासमवेत जंगलात वास्तव्य करीत असे. त्यामुळे सावित्री देखील विवाहानंतर सत्यवानासमवेत जंगलात वास्तव्याला आली आणि आपल्या पतिसमवेत सुखाचा संसार करु लागली सोबत आपल्या अंध सासु सासरांची सेवा करू लागली.

एक दिवस अचानक सावित्रीला सत्यवानाचा मृत्यु समिप आल्याचे कळताच सावित्रीने कठीण असे सावित्री व्रत सुरु केले. न खातापिता ती परमेश्वराचा धावा करू लागली. सत्यवान जेव्हा लाकडे तोडण्याकरता निघाला त्यावेळी सावित्री देखील त्याच्या मागोमाग निघाली.

सत्यवानाने लाकडे तोडायला सुरुवात केली आणि त्याला अचानक भोवळ आली आणि तो खाली कोसळला आणि तेवढ्यात यमराजा त्याचे प्राण घेण्याकरता आला आणि प्राण घेऊन निघाला देखील पण त्याच्या मागोमागच वेगाने सावित्री आपल्या पतिचे प्राण परत घेण्याकरता निघाली.

यमराजाने तिला माघारी फिरण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला. आपल्या पतिचे प्राण परत करण्याकरता ती दयायाचना करू लागली. यमाने तिला पति सोडुन तीन वर मागण्यास सांगितले. त्यावेळी सावित्रीने आपल्या अंध सासूसासऱ्यांकरीता दृष्टी मागितली, त्यांचे राज्य परत मागितले, आणि आपल्याला पुत्र व्हावा हा तिसरा वर मागितला. यमाने घाईघाईत तीला तथास्तु असा वर दिला आणि त्याक्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.

सावित्रीची पतिनिष्ठा पाहुन यमराजा देखील आश्चर्यचकीत झाला आणि कधीही आपल्या निर्णयापासुन न फिरलेला यम त्या दिवशी सावित्रीच्या पतिनिष्ठेपुढे झुकला आणि सत्यवानाचे प्राण परत केले. ज्येष्ठ मासातील पौर्णिमा ही “वटपौर्णिमा’’ म्हणुन ओळखली जाते. सावित्रीसह ब्रम्हा ही या व्रतातील मुख्य देवता आहे.

सावित्रीला सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली पुन्हा प्राप्त झाल्याने स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करतात. वस्त्र, फळं, फुलं वडाला वाहुन भक्तिभावाने आपल्या पतिच्या दिर्घायुष्याकरीता आराधना करतात.पर्यावरणाच्या दृष्टीने देखील वडाच्या झाडाचे अतिशय महत्व असुन या झाडाचा विस्तार देखील खुप होतो या झाडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील पुजेमागचा हेतु असु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT