Palmistry signs google
संस्कृती

तुमच्या हाताच्या रेषांवरून कळते की तुम्हाला कोणत्या आजाराचा त्रास होऊ शकतो?

या रेषा सांगू शकतात की येणाऱ्या काळात कोणते आजार तुम्हाला होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला माहिती का की, हाताच्या रेषांवरून फक्त आपले करिअर आणि पैसा याविषयीच कळू शकतं अस नाही तर भविष्यात आपल्याला कोणते आजार होऊ शकतात हेही हाताच्या रेषांवरून कळू शकतं.तुुमच्या हाताच्या रेषांवर म्हणजे तळहातावर अशी काही चिन्हे आहेत, ज्या रेषा सांगू शकतात की येणाऱ्या काळात कोणते आजार तुम्हाला होऊ शकतात.

पोटाचे आजार:

जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर चंद्र पर्वतावर नक्षत्राची चिन्हे असतील तर असे समजले जाते की अशा लोकांना पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. जर तुमच्या हातावर अशी चिन्हे असतील तर तुम्ही वेळीच काही उपाय करावे.

हृदयाचे आजार:

जर तुमच्या हातावर हृदय रेषेवर बेट चिन्ह असेल आणि मेंदूच्या रेषेचा रंग हलका पिवळा असेल किंवा वय रेषेच्या जवळ मंगळावर काळा ठिपका असेल किंवा हृदय रेषेवर काळ्या रंगाचा तीळ असेल तर अशा लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता असते.

किडणीचे आजार:

जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर मेंदूच्या रेषेवर मंगळाच्या जवळ पांढरे डाग पडले असतील किंवा दोन्ही हातांची हृदयरेषा तुटलेली असेल तर त्या व्यक्तीला किडनीचा आजार होण्याची शक्यता असते.


फुफ्फुसाचे आजार:

जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील शनी क्षेत्राच्या खाली मेंदूच्या रेषेवर साखळीसारखा आकार असेल तर अशा लोकांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते आणि त्यांना घशाचे आजारही होऊ शकतात.


नखांचे आकार:

जर एखाद्याच्या हातात त्रिकोणाच्या आकाराचे नखे असतील आणि शनीच्या पर्वतावर अनेक रेषा असतील आणि नक्षत्राचे चिन्ह देखील हातावर असेल आणि चंद्राच्या पर्वतावर जाळे असेल तर असे लोक खूप कमजोर असतात आणि ते पक्षाघात होण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT