Rameswaram Cafe Bomb Blast Case
Rameswaram Cafe Bomb Blast Case esakal
देश

रामेश्वरम कॅफेत बाॅम्ब ठेवलेल्याची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस; NIA ची मोठी घोषणा, दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध

सकाळ डिजिटल टीम

एनआयए अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोटाचा तपास व्यापक केला असून आता बाॅम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा (Terrorists) फोटो प्रसिद्ध केला आहे.

बंगळूर : येथील रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणाचा (Rameswaram Cafe Bomb Blast Case) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) तीव्र केला असून बाॅम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, या संदर्भात माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

एनआयए अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोटाचा तपास व्यापक केला असून आता बाॅम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा (Terrorists) फोटो प्रसिद्ध केला आहे. या बाॅम्ब ठेवलेल्या संशयिताची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही केली आहे.

यापूर्वी सीसीबीने (CCB) केलेल्या तपासादरम्यान बाॅम्ब ठेवलेल्या संशयिताचा मास्क न लावलेला फोटो सापडला होता. आता तो फोटो एनआयएने प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कॅफेला भेट देऊन जागेची पाहणी केली. कॅश काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरा तपासला आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी विविध ३८ नमुन्यांची माहितीही एनआयए अधिकाऱ्यांना दिली आहे.

महत्त्वाचा धागा हाती

गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पोलिसांना बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी-तीव्रतेच्या बाॅम्बस्फोटाबाबत एक महत्त्वाचा सुगावा मिळाला आहे आणि ते लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील.

दोन दिवस तपास करणाऱ्या पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. संशयाच्या आधारे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मंगळवारी या प्रकरणाचा सखोल तपास केला.

नाव गुप्त ठेवणार

एनआयएने नागरिकांना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती दिसल्यास त्यांनी ताबडतोब ०८०-२९५१०९००, ८९०४२४११०० वर दूरध्वनी, मोबाईलवर माहिती द्यावी. त्यांना संशयित आरोपीबद्दल माहिती असल्यास त्वरित संस्थेला कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT