Rape Sakal
देश

दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरातल्या नोकरानेच केलेल्या या बलात्कारामध्ये ही लहानगी गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

तिला सध्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील बालरोग शस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की, या चिमुरडीच्या जननेंद्रियासह योनीमार्ग आणि गुदद्वाराचा भाग या हल्ल्यामध्ये गंभीर रित्या जखमी झाला आहे. रविवारी रात्री सादतगंज भागामध्ये ही क्रूर घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना घडताना मुलीची आई स्वयंपाकघरात होती. जेंव्हा तीला किंचाळतानाचा आवाज ऐकू आला तेंव्हा ती बेडरुमच्या दिशेने धावली. त्याठिकाणी तिला त्यांचा घरातला नोकर सनी हा आक्षेपार्ह स्थितीत आढळला. तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

सादगंजचे पोलिस अधिकारी ब्रिजेश कुमार यादव यांनी सांगितलंय की, नातेवाईकांच्या तक्रारीनुसार, आरोपीला सोमवारी बलात्काराच्या तसेच लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पॉस्को कायद्यातंर्गत अटक करण्यात आली आहे.

बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. जे डी रावत यांनी म्हटलंय की, या घटनेमुळे मुलीच्या जननेंद्रियासह योनीमार्ग आणि गुदद्वाराचा भाग या हल्ल्यामध्ये गंभीर रित्या जखमी झाला आहे. ती सध्या गंभीर आणि अत्यावस्थ आहे. लघवी करताना तिला वेदना होत आहेत, त्यासाठी तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahad Civic Chief Assault: महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोळेकर यांना मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीसह कामबंद आंदोलन

'पवित्र रिश्ता'मधली अंकिताची वहिनी आठवतेय? वयाच्या ६३ व्या वर्षीही आहे अविवाहित; कारण सांगत म्हणाली, 'समाज काहीही म्हणू दे...

Marathi News Live Updates: शिक्षकांच्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाने नाशिक दणाणले

Narayangaon flood damage: पुरामुळे मीना नदीवरील नेवकर पुलाची दुरावस्था; शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी गैरसोय, नवीन उंच व रुंद पुलाची तातडीची मागणी

Rare Glowing Mushroom : भीमाशंकर, तिलारीनंतर आता वेंगुर्ल्यात निसर्गाचा करिष्मा! रात्रीच्या वेळी स्वतः मधून प्रकाश निर्माण करणारी अळंबी पाहिली का? जागतिक स्तरावर झाली नोंद

SCROLL FOR NEXT