River_ File Photo 
देश

उत्तर प्रदेश : नाव उलटून १० जण बुडाले, दोन जणांचा मृत्यू

बाराबंकी जिल्ह्यातील गोमती नदीत ही नाव बुडाली

सकाळ डिजिटल टीम

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातील गोमती नदीमध्ये (Gomati River) नाव बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या नावेतून १० लोक प्रवास करत होते. या ठिकाणी बचाव मोहिम सुरु असून आत्तापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीनं प्रशासन बचाव मोहिम सुरु केली आहे. (10 People Drowned In Gomati River at Barabanki in Uttar Pradesh)

माध्यमांतील वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी गोमती नदी नावेतून पार करताना ती नदीत बुडाली. स्थानिकांच्या माहितीनुसार, २२ जण या नावेमधून प्रवास करत होते. पोहायला येणारे लोक पोहत पाण्याबाहेर आले. पण दहाहून अधिक लोक नदीत बुडाले.

दरम्यान, स्थानिक पाणबुड्यांच्यामदतीनं बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत दोन व्यक्तींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत तर इतरांचा शोध अद्याप सुरु आहे. नाव बुडाल्याची खबर मिळताच मोठी खळबळ माजली. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावणार! २०२६-२०२७ मध्ये GDP वाढ ७ टक्के राहण्याचा IMFचा अंदाज

CJP Protest : काँग्रेसच्या मोर्चात सीजेपीचे कार्यकर्ते का दिसले नाहीत? आशुतोष रांकाने सांगितले 'हे' कारण

Megablock: कसारा ब्लॉकचा लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका, १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : सोयाबीनच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण; एकाच दिवसात ४० लाखांचे नुकसान!

Cricket News: महाराष्ट्राच्या संघाला ३३३ धावांवर रोखले; रणजी क्रिकेट करंडक ;सेनादलच्या एक बाद ७४ धावा

SCROLL FOR NEXT