Ramdev Baba
Ramdev Baba file photo
देश

टर..टर..हे कसले डॉक्टर; रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे मी व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजवरून बोललो होतो. आधी रेमडेसिव्हिर फेल ठरलं, प्लाझ्मा थेरपी बंद करण्यात आली. असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं.

नवी दिल्ली : अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, अशा शब्दांत अॅलोपॅथीच्या उपचारावर टीका करणाऱ्या रामदेव बाबांनी आता पुन्हा एकदा डॉक्टरांशी पंगा घेतला आहे. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही एक हजार डॉक्टर मृत्यू पावले. हे कसले डॉक्टर? अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं रामदेव बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रामदेव बाबांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. (10 thousand doctors died despite covid-19 doses says Ramdev Baba video viral)

एका योग प्रशिक्षण वर्गावेळी रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे. या व्हिडिओत ते योग करत असून तेथे उपस्थित लोकांशी चर्चाही करत असल्याचे दिसून येते. रामदेव बाबा म्हणाले, तिसरा एकजण मला म्हणाला की मला डॉक्टर व्हायचं आहे. टर... टर... टर.. टर... टर बनायचं आहे... डॉक्टर... एक हजार डॉक्टर आताच कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यू पावले. किती? एक हजार... कालचीच बातमी आहे. जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते कसले डॉक्टर? अशा शब्दांत रामदेव बाबांनी डॉक्टरांची टर उडवली.

स्वामी रामदेवसारखे डॉक्टर व्हा

डॉक्टरांची टर उडवून एवढ्यावर थांबतील ते रामदेव बाबा कसले? ते पुढे म्हणाले, 'डॉक्टर व्हायचं असले, तर स्वामी रामदेवसारखे व्हा. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही पण सर्वांचा डॉक्टर आहे. विदाउट एनी डिग्री… विथ डिव्हिनिटी… विथ डिग्निटी आय एम ए डॉक्टर,' असंही ते पुढे म्हणाले.

अॅलोपॅथीबाबतचा वाद

दरम्यान, अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे मी व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजवरून बोललो होतो. आधी रेमडेसिव्हिर फेल ठरलं, प्लाझ्मा थेरपी बंद करण्यात आली. असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं. त्यावरून आयएमएने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी खडसावल्यानंतर रामदेव बाबांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं होतं. आता त्यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. यावरही आयएमए, विरोधी पक्षांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT