100 कोटी लसीकरण; पंतप्रधान मोदींनी DP केला अपडेट sakal
देश

100 कोटी लसीकरण; PM मोदींनी बदलले प्रोफाइल पिक्चर

लसीकरण केंद्रांमध्ये मिठाईचे वाटप करून लोकांनी आनंद केला व्यक्त

राहुल शेळके

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आज भारताने मोठी बाजी मारली. देशातील लसीकरणाने शंभर कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठला. या ऐतिहासिक क्षणी देशभर उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. दिल्लीतील संसद भवनाची इमारत रोषणाईने उजळून निघाली होती तर वारसास्थळी रांगोळ्या काढून, रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांमध्ये मिठाईचे वाटप करून लोकांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीय, आरोग्य सेवक, कोरोना योद्धे आदींना शुभेच्छा दिल्या. भारतीय विज्ञान, कार्यक्षमता व १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व हे लक्ष्य साध्य करण्यात आपापले योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

भारताने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे . या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणी नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा प्रोफाईल फोटो फेसबुक वरून हटवला आहे. फेसबुक प्रोफाईल बदलून देशाचे अभिनंदन करणारी पोस्ट केली त्यांनी केली आहे. या ग्राफिक फोटो मध्ये त्यांनी 'भारताचे अभिनंदन १०० कोटी लसीकरणाचे डोस पुर्ण' अशा आशयाची पोस्ट'त्यांनी टाकली आहे. फेसबुक पोस्ट खाली भारतीयांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणाऱ्या कंमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT