vaccinationj 
देश

103 वर्षाच्या महिलेने घेतली Covid-19 लस; ठरली देशातील सर्वाधिक वयस्कर व्यक्ती

सकाळन्यूजनेटवर्क

बेंगळुरु- भारतात लसीकरणाच्या मोहिमेने गती घेतली आहे. तसेच देशात नवे विक्रम बनताना दिसत आहे. मंगळवारी बेंगळुरुच्या 103 वर्षाच्या कमलेश्वरी यांनी कोरोनावरील लशीचा डोस घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणानुसार, त्या कोरोनावरील लस घेणाऱ्या देशातील सर्वाधिक वयाच्या महिला ठरल्या आहेत. बेंगळुरुच्या अपोलो हॉस्पिटलच्या हवाल्याने एएनआयच्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या नोएडामध्येही 103 वर्षे वय झालेल्या एका व्यक्तीला कोरोनावरील लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. नोएडाचे महाबीर प्रसाद माहेश्वरी परिवारातील सात वरिष्ठ नागरिकांनी कोरोनावरील लस घेतली आहे.

देशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत 60 वर्षे वयापुढील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत 2.40 कोटी लोकांना कोरोना विषाणूवरील लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. 

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत 17,921 कोरोनाचे नवे रुग्ण सापडेल आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,12,62,707 वर पोहोचली आहे. काल देशात 20,652 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला . या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,09,20,046 वर पोहोचली आहे. देशात 133 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,58,063 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,84,598 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

भारतात काल 7,63,081 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 22,34,79,877 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती ICMR ने दिली आहे. महाराष्ट्रात काल 9,927 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 12,182 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,89,294 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95,322 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.34% झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT