bird-flue-outbreak
bird-flue-outbreak 
देश

चिंता वाढली! 'बर्ड फ्लू'मुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद

कार्तिक पुजारी

भारतात मंगळवारी बर्ड फ्लूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यची नोंद झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या एम्समध्ये एका 11 वर्षीय मुलाचा एच5एन1 एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- भारतात मंगळवारी बर्ड फ्लूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यची नोंद झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या एम्समध्ये एका 11 वर्षीय मुलाचा एच5एन1 एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यावर्षी जानेवारीमध्ये अनेक राज्यांनी बर्ड फ्लूमुळे पक्षी मरत असल्याची माहिती दिली होती. यात कावळे, कोंबड्या आणि इतर पक्षांचा समावेश होता. पक्ष्यांच्या मृत्यूमुळे प्रशासन सक्रिय झाले आणि मोठ्या प्रमाणात सॅम्पल घेण्यास सुरुवात केली. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लूची प्रकरणे आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. (11 yr old likely to be country first documented case of bird flu H5N1 influenza)

दिल्ली एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला जूनमध्ये रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. डॉक्टरांना सुरुवातीला मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आला. पण, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर मुलाचे सॅम्पल पुण्यातील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी येथे पाठवण्यात आले. त्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आली. पण, मुलाला बर्ड प्लू कसा झाला याचे कारण समजू शकलेले नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विषाणूचा प्रसार लागण झालेल्या पक्षांच्या विष्ठा, नाकातील स्त्राव, डोळे आणि तोंडावाटे होऊ शकतो. शक्यतो या विषाणूचा प्रसार माणसांकडून माणसांकडे होत नाही. कारण, हा विषाणू तितका प्रगल्भ नाही. मृत पक्षी, पॉलट्री व्यवसायाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते. माणसाला याची लागण होण्याची शक्यता कमी असते, पण असं झाल्यास विषाणू जीवघेणा ठरु शकतो.

काय आहे हा रोग?

बर्ड फ्लू अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला. तो सुद्धा चीनमध्ये. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT