देश

गेम अपडेटच्या नादात 3.2 लाख गायब

नामदेव कुंभार

ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सध्या फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. लहान मुलं गेम खेळण्यासाठी मोबाइल घेतात अन् अचानक खात्यावरुन पैसे गायब होतात. ना फोन कॉल, ना ओटीपीची मागणी किंवा सिक्रेट पिनची कोणतीही मागणी न करताही खात्यावरुन पैसे कट झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची धक्कदायक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. एका महिलेच्या खात्यावरुन तीन लाख 20 हजार रुपये लपांस झाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही ओटीपी किंवा पिन नंबरचीही मागणी केली गेली नव्हती.

पोलिसांनी या घटनेचा आधिक तपास केला असात गेमिंगच्या माध्यमातून पैसे लंपास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगडच्या कांकेर येथा हा प्रकार घडला आहे. एक महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला आपल्या खात्यावर फक्त 9 रुपये शिल्लक असल्याचं दिसलं. खात्यातून तब्बल तीन लाख 20 हजार गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर महिलेनं पोलिसांत धाव घेत तक्रार केली.

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून महिलेच्या खात्यावरुन तीन लाख 20 हजार रुपये लंपास झाल्याचं पोलिसांना तपासून समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही रक्कम काढण्यासाठी तब्बल 287 वेळा व्यवहार करण्यात आले होते. महिलेच्या 12 वर्षाचा मुलगा फ्री फायर हा गेम खेळत असताना खात्यावरुन पैसे लंपास झाल्याचा प्रकार घडला आहे. 12 वर्षाच्या मुलाला फ्री फायर या ऑनलाइन गेमचं व्यसन लागलं आहे. मोबाइलवर तो सतत गेम खेळत होता. गेमसाठीच्या आर्थिक व्यवहारांसाठी 12 वर्षाच्या मुलाने आईचे बँक खातं लिंक केले होते. तो गेममध्ये हत्यारे खरेदीसाठी या बँक अकाऊंटचा वापर करायचा. यातूनच त्याने तब्बल 287 वेळा व्यवहार करत 3 लाख 22 हजार रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, या व्यावहारासाठी कोणताही कॉल आलेला नव्हता. तसेच ओटीपी, एटीएम पिन नंबरही त्यांच्याकडून कधी मागितला गेला नव्हता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT