BJP
BJP esakal
देश

BJP leaders Quit Party: भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : भाजपच्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या 'ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम' (AIDMK) या पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तामिळनाडूतील नेते आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजपच्या नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला आहे.

यावर भाजपच्या आयटी विंगचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटलं, "मी भाजपसाठी अनेक वर्षे काम केलंये. लोकांना माहिती आहे की, मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरु असलेल्या विचित्र कारभारामुळं मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला"

भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामध्ये १० आयटी विंगमधील जिल्हा सचिव आणि दोन आयटी विंग जिल्हा उपसचिवांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आयटी विंगचे प्रमुख निर्मल कुमार यांनी भाजपच्या अन्नामलाई यांच्यावर गंभीर आरोप करत अद्रमुकमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर हा राजीनाम्याचा सिलसिला कायम राहिला.

या प्रकारानंतर अन्नामलाई यांनी आरोप केला की, "भाजपच्या काही नेत्यांनी अद्रमुकत प्रवेश केला. त्यांना वाटतंय की ते मोठा पक्ष चालवत असून भाजपच्या नेत्यांना विकत घेऊन त्यांचा पक्ष आणखी मोठा करणार आहेत. यावरुन एकच सिद्ध होतं की, भाजप तामिळनाडूत मोठा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT