Madhya Pradesh esakal
देश

गरबा बघून भावासोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय.

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यात गरबा बघून आपल्या चुलत भावासोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आलीय. पीडित मुलीनं आई आणि भावासह घटनेनंतर दोन दिवसांनी पोलीस स्टेशन गाठलं (Bhopal Police Station) आणि गुन्हा नोंदवलाय.

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं, की ती तिच्या चुलत भावासोबत घरी जात असताना वाटेत खूप अंधार होता. तो मार्ग दिसत नसल्याने त्यांनी टॉर्चचा वापर केला, तेव्हा गावातील दोन लोकांनी त्यांना पाहिलं आणि धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझ्या चुलत भावाला मारहाण करुन त्याला तिथून हाकलून दिलं आणि माझ्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींवर एससी/एसटी अंतर्गत अॅट्रोसिटी गुन्हा (Atrocity Crime) दाखल करण्यात आलाय. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बलात्काराची भयानक घटना समोर आली होती. या घटेनेनं दिल्लीत घडलेल्या महाभयंकर निर्भया हत्याकांडाची आठवण करुन दिली होती. त्यापाठोपाठ डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याशिवाय, देशभरात बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. सरकार कडक कारवाई आणि कडक कायदे करण्याचा दावा करतं. मात्र, अशा घटना थांबताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या राज्यांतून येणाऱ्या बलात्काराच्या घटना महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT