corona dead body e sakal
देश

सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी

गेल्या कित्येक महिन्यांपासून ती कोरोनाग्रस्तांसाठी सातत्याने झटत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. आतापर्यंत अनेकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. परंतु, या संकटकाळातही अनेकांमधील माणुसकीचं दर्शन घडलं. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बेवारस मृतदेहांवर काही सामाजिक संस्था, काही व्यक्ती स्वत: पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करत आहेत. यात एक १६ वर्षाची मुलगी आदर्श ठरली आहे. केवळ १६ वर्षांची असलेली ही मुलगी स्वत: पुढाकार घेऊन बेवारस असलेल्या कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे.

तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात राहणाऱ्या १६ वर्षीय देवीश्रीवर सध्या सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवीश्री तिच्या दोन महिला सहकाऱ्यांसोबत बेवारस असलेल्या कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. देवीश्री अन्नम सेवा फाऊंडेशन या संस्थेशी निगडीत असून गेल्या कित्येक महिन्यांपासून ती कोरोनाग्रस्तांसाठी सातत्याने झटत आहे.

"या संस्थेविषयी मला पूर्वीपासूनच माहिती होती. त्यातच सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वे रुळांवर एक बेवारस मृतदेह सापडला असून त्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ही जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मी संस्थेला सांगितलं. विशेष म्हणजे त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेऊन मला पाठवलं व माझ्यासोबत दोन अन्य महिला सहकारीदेखील दिल्या. या घटनेनंतर माझ्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. माझ्याकडून जितकं शक्य आहे, ते सगळं करण्याचा प्रयत्न मी करते", असं देवीश्रीने सांगितलं.

दरम्यान, देवीश्री सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी असून ती इंटरमीडिएटचं शिक्षण घेत आहे. तर, तिचे आई-वडील येल्लांडु येथे एक नाश्त्याचा स्टॉल चालवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स, गतविजेत्या RCBच्या ताफ्यात बदल! प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'हे' डाव यशस्वी ठरणार की...?

SCROLL FOR NEXT