Pakur Accident  Team eSakal
देश

ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात १७ ठार; राष्ट्रपतींसह PM मोदींकडून शोक

अपघातातील अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

सुधीर काकडे

देशभरात रस्ते अपघातात दिवसाला शेकडो अपघात होतात. त्यामध्ये हजारो लोकांचा रोज मृत्यू होतो. त्यातच काल झारखंडच्या (Jharkhand) पाकूरमध्ये (Pakur Accident) काल एक भीषण अपघात झाला. गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक आणि बसचा अपघात झाला. या अपघातात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार विमल यांनी दिली. भरधाव बस आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणारी ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, मात्र सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही, तसं झालं असतं तर घटना आणखी गंभीर झाली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह

SCROLL FOR NEXT