Cough Syrup esakal
देश

Cough Syrup: कफ सिरप पिल्याने १८ लहानग्यांचा मृत्यू; भारताला धरले जबाबदार

कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटनेला भाराताला जबाबदार धरण्यात आलं आहे. गँबियानंतर आता उझबेकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. (18 children dead due to cough syrup made by Indian firm says Uzbekistan)

मिळालेल्या माहितीनुसार, उज्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रलयाने 18 जणांच्या मृत्यूसाठी भारताला जबाबदार धरले आहे. आरोग्य मंत्रालयने सांगितलं की, मृत झालेल्या 18 मुलांनी नोएडा येथील मॅरियन बायोटेकमध्ये तयार झालेल्या डॉक-1 मॅक्स सिरपचं सेवन केले होतं.

क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

गँबियामध्ये 66 मुलांचा कप सिरपच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण यापुर्वी समोर आलं होतं. मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. ही कंपनी 2012 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये रजिस्टर्ड झाली होती. असे उज्बेकिस्तानने म्हटलं आहे.

'मृत मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोन ते सात दिवस डॉक-1 मॅक्स सिरप दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केले होतं. याची मात्रा 2.5-5 ML यादरम्यान असेल. जी मुलांसाठी औषधाच्या प्रमाणित डोसपेक्षा जास्त आहे, असे उज्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

औषधांमध्ये प्रामुख्याने पॅरासिटामोल आहे, ज्याचा वापर आई-वडिलांनी चुकिच्या पद्धतीनं केला आहे. त्यांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मेडिकलमधून खरेदी केलं. मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यानंतर सिरपचा वापर करण्यात आलाय. असही निवेदनात म्हटलं आहे. मात्र, औषधांमध्ये कोणत्या प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT