Brij Bihari Prasad Murder Case Bihar Minister Esakal
देश

Brij Bihari Prasad Murder Case: माजी मंत्र्याच्या हत्येप्रकरणी, माजी आमदाराला जन्मठेप तर माजी खासदाराची निर्दोष मुक्तता

Bihar Minister Murder Case: पतीच्या हत्येनंतर रमादेवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 मध्ये पक्षाच्या तिकिटावर विजयी होऊन त्या शिवहर लोकसभेतून संसदेत पोहोचल्या होत्या.

आशुतोष मसगौंडे

1998 मध्ये बिहारचे माजी मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. माजी आमदार मुन्ना शुक्ला आणि अन्य एकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावणारा ट्रायल कोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने माजी खासदार सूरजभान सिंग यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी या खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता.

पाटणा उच्च न्यायालयाने 2014 मध्ये सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. पण माजी मंत्र्याच्या पत्नी आणि भाजप नेत्या रमा देवी आणि सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 21 आणि 22 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.

1998 मध्ये माजी मंत्री ब्रिजबिहारी प्रसाद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रिजबिहारी प्रसाद हॉस्पिटलच्या आवारात फिरत होते. त्यावेळी तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यावेळी बिहारमध्ये राबडी देवी सरकार होते.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 2009 मध्ये 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने सूरजभान सिंह, विजय शुक्ला उर्फ ​​मुन्ना शुक्ला, मुकेश सिंह, राजन तिवारी, लालन सिंह, मंटू तिवारी, राम निरंजन चौधरी, सुनील सिंह आणि शशी कुमार राय यांना आरोपी केले होते.

पतीच्या हत्येनंतर रमादेवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 मध्ये पक्षाच्या तिकिटावर विजयी होऊन त्या शिवहर लोकसभेतून संसदेत पोहोचल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT