viral video 
देश

Video: 'भारत माता की जय' म्हणताच जमावाकडून हल्ला? भाजपकडून व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप

BJP Workers Brutally Stabbed : भारतीय जनता पक्षाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भाजपने सिद्दरामया यांच्या काँग्रेस सरकारला यावरून धारेवर धरलं आहे.

कार्तिक पुजारी

मंगळुरु- एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत माता की जय म्हणल्यानंतर दोन तरुणांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटकच्या मंगळुरुमधील हा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भाजपने सिद्दरामया यांच्या काँग्रेस सरकारला यावरून धारेवर धरलं आहे.

कर्नाटकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचे राज्य आता राहिलेले नाही, असं भाजपकडून म्हणण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी 'भारत माता की जय'ची घोषणा दिल्यानंतर जमाव त्यांचा पाठलाग करतो. 'सकाळ माध्यम समूह' या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

भाजपने दावा केलाय की, ते पक्षाचे कार्यकर्ते असून हरिष अंचन आणि नंदकुमार अशी त्यांची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ते साजरा करत होते. मोठ्या प्रमाणात लोक असलेल्या ठिकाणी त्यांनी 'भारत माता की जय'ची घोषणा दिली. त्यानंतर जमावाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

दोन तरुणांनी जमावाच्या जवळ जाताच भारत माता की जय म्हटलं आणि त्याठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरुण भगवे दुपट्टे घातले असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणांच्या घोषणेने जमाव संतापला, त्यानंतर त्यांचा पाठलाग केला जातो. जमाव त्यांचा पाठलाग करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. व्हिडिओ इथेच संपतो. भाजपने दावा केलाय की, 'त्यानंतर तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जमाव एका विशिष्ट धर्माचा होता.'

भाजपने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, 'असं दिसतंय की कर्नाटकमध्ये तुघलकी राज्य आलं आहे. भारत माता की जय म्हणणे आता सुरक्षित राहिलेलं नाही. सिद्धरामय्या यांच्या काळात भारताबाबत द्वेष निर्माण केला जात आहे. मोदींचा शपथविधी साजरा करणाऱ्या दोन भाजप कार्यकर्त्यांवर भारत माता की जय म्हटल्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर अबुबकर, बशिर, सिद्दिक, मोनू आणि इतर २० जणांनी हल्ला केलाय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT