Naresh Maske  
देश

UBT MP: 'उबाठा सेनेचे 2 खासदार शिंदेंच्या संपर्कात?' दिल्लीत नरेश म्हस्केंनी केला मोठा दावा

Naresh Maske made a big claim: UBT च्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केलाय. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- UBT च्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केलाय. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा तोंड फुटलं आहे.

नरेश म्हस्के म्हणाले की, 'ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक शिवसैनिक पुन्हा येण्यासाठी आमच्याशी संवाद साधत आहेत. निर्णय हा एकनाथ शिंदे घेणार आहेत.'

UBT च्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केलाय. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळं ते थांबले आहेत. मात्र ६ लोक जमवून ते पुन्हा आमच्यासोबत येणार आहेत. हे काल रात्री दिल्लीत घडलं आहे. आम्हाला प्रेशर टॅक्टिक करण्याची गरज नाही. मतदार आमच्या सोबत नसते तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का ?, असा प्रश्न म्हस्के यांनी केला.

विकासकाम व्हावीत यासाठी ठाकरेंचे खासदार आमच्यासोबत यायला तयार झाले आहेत. शिवसेनेच्या तत्वांसाठी ते आमच्या सोबत यायला तयार आहेत. गेले २ दिवस ठाकरे गटाचे आणि शरद पवार यांच्या पे रोल वरील व्यक्ती खोट्या गोष्टी मीडिया समोर सांगत आहेत. उबाठाचा मुळ मतदार त्यांच्यापासून दूर गेला आहे. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन, मुल्ला मौलवींनी लाखो रुपये वाटून एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका समाजाची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केला गेला, असा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

एक दिवसापूर्वी, शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार ठाकरे गटात येणार असल्याचा दावा ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने केला होता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे गटाकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ राजकारणापोटी असे दावे केले जात आहेत का? अशी शंका घेण्यास वाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT