CJI-dy chandrachud 
देश

CJI चंद्रचूड यांच्यासमोर सुरू होती सुनावणी अन् व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन पोहोचले ज्येष्ठ वकील... पुढे काय झालं?

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या सादर केल्या. दोन दारु कंपन्यांमध्ये ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.

Sandip Kapde

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत. अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या सुनावणीचा डीवाय चंद्रचूड एक भाग राहीले आहेत. दरम्यान काल (शुक्रवार) सुनावणी दरम्यान त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन दारु कंपन्यांमध्ये ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.

दरम्यान, सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या सादर करण्यात आल्या. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी या बाटल्या सरन्यायाधीशांसमोर ठेवल्या. डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपीलावर सुनावणी सुरू होती. यामध्ये, इंदूरमध्ये असलेली जेके एंटरप्रायझेस या कंपनीला लंडन प्राईड नावाने शीतपेय बनवण्यापासून रोखण्याचे मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डचे आवाहन फेटाळण्यात आले होते.

याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. यावेळी दोन बाटल्या CJI आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासमोर सादर करण्यात आल्या. यानंतर सरन्यायाधीश मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही बाटल्या आणल्या आहेत? नंतर सरन्यायाधीशांना विचारण्यात आले की ते सादर केलेल्या दोन्ही बाटल्या घेऊन जाऊ शकतो का? यावर सरन्यायाधीशांनी हसत हसत उत्तर दिले की हो कृपया घेऊन जा. (Latest Marathi News)

यानंतर रोहतगी यांनी उत्तर दिले की त्यांना दोन्ही उत्पादनांमध्ये साम्य दाखवावे होते. यानंतर त्यांनी या प्रकरणात ट्रेडमार्कचे उल्लंघन कसे झाले हे सांगितले. यानंतर खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. याप्रकरणी आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

Religious Tourism Bus Service : शिवशाही, आरामदायीमधून पर्यटकांसाठी विशेष बस सेवा, सहलींमध्ये निवास व भोजन व्यवस्था

Gadchiroli: दिल्ली येथे शैक्षणिक सहलीसाठी नागपूर विमानतळावरून प्रस्थान करताना विद्यार्थी.गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने 'दिल्ली उड्डाण'; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट !

SCROLL FOR NEXT