Rape Sakal
देश

मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसह चौघांचा २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : हरियाणातील गुरुग्राममधील २३ वर्षीय तरुणीवर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात सामूहिक बलात्कार (crime) झाल्याची घटना घडली. तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसह चौघांनी हा बलात्कार केला असून आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम येथील तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी राजस्थानला आली होती. त्यावेळी तिने मैत्रिणीसोबत जयपूरला मुक्काम केला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीचा प्रियकर जयपूरला पोहोचला. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या प्रियकरासोबत दौसा येथे गेली. त्याठिकाणी आरोपीने पीडितेला दारू पाजली. त्यानंतर आणखी तिघांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळणात कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासणीसाठी पीडितेला पुन्हा घटनास्थळी नेण्यात आले.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीची चौकशी करण्यासाठी एक पथक जयपूरलाही पाठवले आहे. त्यामुळे आरोपींना लवकरच अटक केली जाईन, असे दौसाचे पोलिस अधीक्षक अनिल बेनिवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT