Rape on Women File Photo
देश

फेसबुकवरील मित्रानं केला घात; महिलेवर २५ जणांकडून अत्याचार

पीडित महिला दिल्लीमध्ये घरकाम करुन गुजराण करत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : फेसबुकवरील मित्रानं (Facebook friend) फसवून एका महिलेला जंगलात (Forest) नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर २५ जणांनी बलात्कार (25 men raped) केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं ९ दिवसांनंतर पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला तेव्हा या अत्याचाराला वाचा फुटली. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (25 men gangrape woman after Facebook friend lures her into forest in Delhi)

पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून दिल्लीमध्ये राहत असून ती घरकामाचं काम करते. या महिलेची जानेवारी महिन्यात फेसबुकवरुन सागर नामक व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर अनेकदा फेसबुकवरुन चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन क्रमांक परस्परांना दिले. यानंतर एके दिवशी सागरने पीडित महिलेला लग्नाची मागणी घातली आणि तिला आपल्या कुटुंबियांना भेटवायचं असल्याचं सांगितलं. या चर्चेदरम्यान, २३ वर्षीय सागरनं पीडित महिलेला हरयाणातील होडल नामक शहरात यायला सांगितलं आणि तिथं आपल्या कुटुंबियांना थेट भेट घडवून आणतो अस आश्वासन दिलं.

यानंतर पीडित महिला ३ मे रोजी दिल्लीहून सागर आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी होडल येथे गेली. महिला संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर सागरने तिला रामगड गावातील एका जंगलात नेलं. त्यावेळी या जंगलात सागरचा भाऊ आणि त्याचे काही मित्र दारु पित बसले होते. दरम्यान, पीडित महिला जंगलात पोहोचल्यानंतर सागर आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागरने संबंधित महिलेला आकाश नामक एका स्क्रॅप डिलरकडे नेलं. या ठिकाणी पीडित महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला. यावेळी महिलेची प्रकृती बिघडली त्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पाच आरोपींनी तिला बदरपूर बॉर्डरजवळ सोडून दिलं, अशा सुमारे २५ जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

१२ मे रोजी महिलेनं हसनपूर पोलीस स्थानकांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिला तक्रार द्यायला उशीर झाला कारण तिची प्रकृती बरी नव्हती. महिलेच्या तक्रारीनंतर प्रमुख आरोपी सागरला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तसेच इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files ओपन! सेक्स स्कँडलचे धक्कादायक 68 नवीन फोटो प्रसिद्ध... बिल गेट्ससह दिग्गज नेत्यांचे फोटो, जग हादरलं!

Ashes Test: ॲशेस कसोटीत ‘डीआरएस’वर शंका; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, कॅरीनंतर स्मिथच्या निर्णयावरही प्रश्‍नचिन्ह

Pimpri News : इंद्रायणी, पवना प्रदूषणमुक्तीसाठी आराखडा; सरपंच, उपसरपंच, अभियंते, अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण

Viral Video: लेकीच्या जन्माचा जल्लोष! धुरंधरमधील 'FA9LA' गाण्यावर वडिलांचा भन्नाट डान्स, यामी गौतमने शेअर केली पोस्ट

Kolhapur City Crisis : २८० टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच; झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे

SCROLL FOR NEXT