mobile Sakal
देश

Digital India! देशात 25 हजार गावांमध्ये आजही नाहीये मोबाईल सेवा

ओडिशा, मध्य प्रदेशातील बहुतांश गावे मोबाईल कनेक्टिव्हिटीपासून वंचित आहेत.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशातील आजही 25 हजारांहून अधिक गावे मोबाईल (Mobile Connectivity ) सेवेशी जोडू शकलेली नाहीत. ओडिशा आणि मध्य प्रदेशातील बहुतांश गावे मोबाईल कनेक्टिव्हिटीपासून अद्यापही वंचित आहेत. बुधवारी लोकसभेत (Parliament) सरकारने एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील 5,400 गावे मोबाईल सुविधेपासून वंचित असून, सरकारने आता विशेष मोहीम राबवून या गावांना सुविधा देण्याची तयारी केली आहे. (25 Thousand Villages Still No Mobile Service In India)

भाजप खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dube) आणि राजस्थानचे दौसाचे खासदार जसकौर मीना यांनी बुधवारी देशातील मोबाईल सेवेपासून वंचित असलेल्या गावांबाबत प्रश्न विचारला होता. ज्यावर केंद्रीय दुरसंचार राज्यमंत्री देवू सिंह चौहान (Devu Singh Chouhan)यांनी देशातील 5,97,618 वस्ती असलेल्या गावांपैकी 25,067 गावांमध्ये अद्याप मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्याचे सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी माहिती दिली की, मोबाईल सेवा नसलेल्या 25,067 गावांपैकी सुमारे 11,000 गावे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. सरकार आणि दूरसंचार सेवा पुरवठादार देशातील उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने जोडण्यासाठी प्रयत्न करत असून, डिजिटल इंडियाच्या युगात सर्व गावांना मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती सरकारडून देण्यात आली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये एकूण 43, 264 गावे आहेत, त्यापैकी 941 गावे अजूनही मोबाईल सेवेने जोडलेली नाहीत. तर, मध्य प्रदेशातील 51, 929 गावांपैकी 2, 612 गावे आणि छत्तीसगडमधील 19, 567 गावांपैकी 1, 847 गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी पोहोचलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT