Kota Councilors eSakal
देश

Kota : कोटा शहराला भासतेय मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता! यावर्षी २६ विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

राजस्थान सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये कोटातील न्यू मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञची नियुक्ती केलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Kota Councilors : ‘नीट’ परीक्षांची तयारी करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांनी यंदा आत्महत्या केल्यामुळे कोटा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. यावर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आपले जीवन उमलत्या वयातच संपविले आहे. आपल्या घरापासून दूर राहून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोटात वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांची मात्र कमतरता आहे.

राजस्थानात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असल्याने देशभरातील पालक आपल्या पाल्यांना राजस्थानातील कोटा, सिकर, जयपूर आदी शहरांत पाठवितात. राजस्थान सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये कोटातील न्यू मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञची नियुक्ती केलेली नाही.

या केंद्रासाठी पाच मानसोपचारतज्ज्ञांची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. राजस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांत मानसशास्त्रात एम.फिल करण्याची सोय नाही. त्यामुळे, ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. इतर राज्यांतील या विषयातील पदवीधारक राजस्थानात आहेत. मात्र, त्यांची संख्या खूपच अपुरी आहे.

न्यू मेडिकल कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाचे डॉ. विनोदकुमार दारिया म्हणाले, की राजस्थानातील सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये वैद्यकीय मानसशास्त्रात एम.फिल अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करून गेल्या वर्षी जानेवारीत राज्य सरकारला पाठविला. त्यानंतर, कुशल मानसोपचारतज्ज्ञांसह समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, कोणत्याही अतिरिक्त अर्थसंकल्पी तरतुदीशिवाय हे केंद्र सुरू झाले, असेही ते म्हणाले.

कोटातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी.एस. शेखावत यांनी कोटामध्ये तज्ज्ञ समुपदेशकांची तीव्र कमतरता असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांसाठी पत्रे लिहूनही त्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. मानसोपचारतज्ज्ञ प्रशिक्षित असावा तसेच त्याच्याकडे पुरेसा अनुभव असायला हवा. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या समुपदेशन केंद्रात मी जवळपास ४०० रुग्णांचे व्यावसायिकरित्या समुपदेशन केले असून त्यातील बहुतेकजण विद्यार्थी आहेत.

दरम्यान, राजस्थानात मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता व वैद्यकीय मानसशास्त्रात एम.फिल सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

खासगी क्षेत्रातही चारच मानसोपचारतज्ज्ञ

कोटातील सरकारी रुग्णालयांत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांची उणीव असताना खासगी क्षेत्रातील चित्रही वेगळे नाही. कोटात अवघे तीन-चार खासगी मानसोपचारतज्ज्ञ असून त्यापैकी दोन मानसोपचारतज्ज्ञ शहरांतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत.

राजस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांत अजूनही एम.फिलचा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. त्याचप्रमाणे, वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्तीही प्रलंबित आहे. राजस्थानातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत मानसिक समस्यांनी त्रस्त रुग्णांची संख्या वैद्यकीय मानसशास्त्रात आठ जागांचा एम.फिलचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.

- डॉ. विनोदकुमार दारिया, मानसशास्त्राचे प्राध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT