auto video google
देश

अबब ! एका रिक्षात २७ प्रवासी; उत्तर प्रदेशातील व्हिडिओ व्हायरल

प्रवाशांची संख्या पाहून पोलिस चक्रावून गेले, कारण ऑटो रिक्षात चालकासह २७ लोक होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नमिता धुरी

मुंबई : पाच जणांच्या जागी दहा जण कसे बसवायचे, ही कला रिक्षावाल्यांना चांगलीच ठाऊक असते. पण उत्तर प्रदेशातील एक असे उदाहरण समोर आले आहे जे फक्त भारतातच पाहायला मिळते.

फतेहपूर जिल्ह्यात रस्त्यावरून जाणारी एक रिक्षा पोलिसांनी थांबवली, तेव्हा त्यामधील प्रवाशांची संख्या पाहून पोलिस चक्रावून गेले, कारण ऑटो रिक्षात चालकासह २७ लोक होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (viral video of autorickshaw)

यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील बिंदकी कोतवाली परिसरात काही लोक ऑटो रिक्षामधून निघाले होते. बिंदकी परिसरातील लालौली चौकात चालक भरधाव वेगाने ऑटो चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी रिक्षा थांबवली आणि मग एक एक करून लहान मुले आणि वडिलधाऱ्यांना बाहेर काढले. पोलिसांनी मोजणी केली असता चालकासह २७ जण बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत रिक्षा जप्त केली.

comments on video

पोलिसांनी एकामागून एक प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढले तेव्हा कोणीतरी हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

तीन चाकी वाहनात एकावेळी २७ जण बसणे ही आश्चर्यकारक घटना आहे. त्यामुळे एका यूजरने ही कला फक्त भारतीयांमध्ये असल्याचे लिहिले. एका यूजरने लिहिले - हा न्यू इंडिया आहे. तर काहींनी गंमतीत लिहिलंय की ते संपूर्ण 'शहर' वाहून नेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT