Love Jihad esakal
देश

Love Jihad : इकडं 'लव्ह जिहाद'च्या नावे राडा; पण मुलगी निघाली लेस्बियन, आता म्हणते…

रोहित कणसे

देशभरात लव्ह जिहाद संबंधीत प्रकरणांबद्दल तक्रारी समोर येत आहेत. यादरम्यान या संबंधीत एक अनोखा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी अल्पसंख्यांक समाजातील दोन भाऊ आणि त्यांच्या आई विरोधात एका २८ वर्षीय महिलेचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय देखील व्यक्त केला जात होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतर या कुटुंबाला अखेर क्लिनचीट मिळाली.

ही महिला एका २१ वर्षीय तरुणीसोबत पळून गेली होती आणि इतकेच नाही तर त्या दोघींनी आता लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

मिळालेल्या मागितीनुसार, ही महिला २६ मे रोजी कथितरित्या गायब झाल्यानंतर या प्रकरणात कलम ३६६ अंतर्गत ३० मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोन भाऊ आणि त्यांच्या आईवर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिलेच्या कुटुंबियांनी आणि तसेच काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल तक्रार दिली होती. तसेच याप्रकरणी बरेली जिल्ह्यातील अओनला पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन देखील करण्यात आले. हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचे देखील सांगण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत महिलेचा शोध सुरू केला तेव्हा ही मुलगी तिच्या गर्लफ्रेंडसोबत सापडली. या महिलेने पोलिसांशी बोलताना सांगितले की आम्ही एकमेकींना तीन वर्षांपासून ओळखतो आणि आमच्यात प्रेम संबंध आहेत. आम्हाला लग्न देखील करायचे आहे. तसेच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समलैंगिक विवाहाबद्दलच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. माझ्या कुटुंबियांना मी इतर कोणाशीतरी लग्न करावं अशी इच्छा होती. त्यामुळे मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेच्या मोठ्या भावाने गुरुवारी टाइम्स ऑफ इंडीयाशी बोलताना सांगितले की, आमच्या पालकांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आणि तेव्हापासून मी कुटुंबाची काळजी घेत आहे. मी माझ्या बहिणीना चांगले शिक्षण दिले. मात्र ती बेपत्ता झाली तेव्हा यामागे जवळच राहणार्‍या दोन भावांचा हात आहे असे मला वाटले. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर बहिणीशी आणि तिच्या मैत्रिणीशी बोलणे झाल्यानंतर दोन भाऊ किंवा त्यांच्या कुटुंबावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असेही त्यांने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

Kedarnath Tourism: मुंबईहून केदारनाथपर्यंत ट्रिप प्लॅन करताय? मग सर्व मार्ग आणि टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

SCROLL FOR NEXT