gold b. 
देश

7 प्रवाशांनी पोटात लपवलं होतं तब्बल 4 किलो सोनं, विमानतळावर उतरताच...

सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई- चेन्नई एअर कस्टम विभागाने 2.17 कोटी रुपयांचे तब्बल 4.15 किलो सोने चेन्नई विमानतळावरुन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 प्रवाशांना अटक केली आहे. सात प्रवाशांनी पॉलिथिनने गुंडाळलेल्या गोल्ड कॅप्सुल्स गिळल्या होत्या. चेन्नई कस्टम विभागाने सोमवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. 

एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सात संशयित आरोपींची चौकशी केली. हे सर्व आरोपी दूबई आणि शारजहा येथून 22 जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहोचले होते. अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांना थांबवून चौकशी करण्यात आली. तपासात त्यांनी गोल्ड कॅप्सुल गिळले असल्याचं कबुल केलं. प्रवासाला निघण्याआधी त्यांनी या कॅप्सुल घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.   

शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम ते अमृता फडणवीसांची बजेटवरील प्रतिक्रिया, ठळक...

कॅप्सुल गिळल्याचे कबुल केल्यानंतर सर्व प्रवाशांना स्टॅनली सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातून कॅप्सुल काढण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. प्रवाशांच्या पोटातून सर्व कॅप्सुल्स काढण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात आलंय. एकूण 4.15 किलो सोने ज्याची किंमत 2.14 कोटी रुपये आहे, जप्त करण्यात आले आहे. कस्टम कायद्यानुसार 8 प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 

2.88 किलोच्या एकूण 160 कॅप्सुल्स 8 प्रवाशांच्या पोटातून काढण्यात आले आहे. याची किंमत 1.28 कोटी रुपये आहे. शिवाय 3 सोन्याच्या साखळ्या, 8 सोन्याच्या रिंग, 61 कॅप्सुल्स बँग आणि पँट पॉकेटमधून जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 82 लाख रुपये असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT