esakal | शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम ते अमृता फडणवीसांची बजेटवरील प्रतिक्रिया, ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Updates

कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना सरकारला धक्के द्यायला सज्ज झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील जमीनीवर मोठमोठे खिळे लावून रस्ता बंद केला आहे.

शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम ते अमृता फडणवीसांची बजेटवरील प्रतिक्रिया, ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना सरकारला धक्के द्यायला सज्ज झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील जमीनीवर मोठमोठे खिळे लावून रस्ता बंद केला आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांकडून देशभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. तर तिकडे म्यानमार प्रकरणाची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. म्यानमार सैन्याने केलेले सत्तापालट आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिकेने गंभीर धमकी दिली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पाचं कौतुक करताना अमृता फडणवीसांना भावना अनावर झाल्यात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे भल्याभल्यांना भूतकाळात जाऊन चाचपण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन - म्यानमार (Myanmar) सैन्याने केलेले सत्तापालट आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की यांना झालेल्या अटकेप्रकरणी अमेरिकेने गंभीर (US Army) धमकी दिली आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन - भारतीय-अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांची काल सोमवारी नॅशनल एरॉनॉटीक्स एँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती केली गेली आहे. सविस्तर वाचा

SSC Recruitment 2021: पुणे - कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) नव्या रिक्त पदांसाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

मुंबई - डीसी डिझाईनचे संस्थापक-प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. सविस्तर वाचा

नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्व विषयांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया आल्याशिवाय राहत नाही. सविस्तर वाचा

ठाणे - मागील सात ते आठ महिन्यांपासून कोरोना या आजारामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच स्तराला बसला आहे. सविस्तर वाचा

‘छे  छे.. या वर्षीच्या अर्थसंकल्पात काही अर्थ नाही. पुण्यातील मुळा- मुठा नदीत व्हेनिस शहराप्रमाणे वाहतूक सुरू करावी व त्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र मी वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिले होते. सविस्तर वाचा

सोलापूर - विडी उद्योगात काम करत आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मोदी लाटेत महापालिकेवर भाजपची सत्ता आली आणि त्यात आम्हाला जनतेने नगरसेवकाची संधी दिली. सविस्तर वाचा

नवी दिल्ली - पंजाब हरियाणा हायकोर्टाने (Punjab and Haryana High Court) फॅमिली पेन्शनप्रकरणी (Family Pension) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil