Agra Taj Mahal esakal
देश

Taj Mahal : 'ताजमहाल'च्या मशिदीत नमाज अदा करणाऱ्या 4 पर्यटकांना अटक

सकाळ डिजिटल टीम

हैदराबादचे चार तरुण ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्यात आले होते.

आग्र्यातील ताजमहाल (Agra Taj Mahal) संकुलामधील मशिदीत (Mosque) नमाज अदा करणाऱ्या 4 पर्यटकांना पोलिसांनी अटक केलीय. यातील 3 तरुण हैदराबादचे (Hyderabad), तर एक आझमगडचा आहे. हे चौघं ताजमहाल परिसरात बांधलेल्या मशिदीत नमाज अदा करत होते, तर तिथं फक्त शुक्रवारीच नमाज पडण्याची परवानगी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी हैदराबादचे चार तरुण ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्यात आले होते. ताजमहालला भेट दिल्यानंतर चौघंही आवारात बांधलेल्या मशिदीत पोहोचले, तिथं माहिती नसल्यानं त्यांनी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच ताजच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन चार पर्यटकांना पकडून स्थानिक ताजगंज पोलिस स्टेशनच्या (Tajganj Police Station) ताब्यात दिलं.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केलाय. दर आठवड्याला शुक्रवारी ताज परिसरात बांधलेल्या मशिदीमध्ये ओळखपत्र दाखवल्यानंतर स्थानिक लोकांनाच नमाजासाठी प्रवेश दिला जातो. अशा परिस्थितीत बुधवारी बाहेरून आलेल्या या पर्यटकांनी नमाज अदा केली, तेव्हा सीआयएसएफच्या जवानांनी कडकपणा दाखवत त्यांना पकडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT