thunderstorm 
देश

उत्तर प्रदेशात पावसासह वादळवाऱ्यामुळे 43 जणांचा मृत्यू; पुढील 24 तास सतर्कतेचे

पीटीआय

लखनऊ - उत्तर भारताला 30 मे रोजी जोरदार पावसाने झोडपले आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या घटनांमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी सरकारकने याबाबतची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय जखमी झालेल्यांवर सरकारकडून उपचार करण्यात येत आहे.

30 मे रोजी झालेला मुसळधार पाऊस आणि वादळ-वाऱ्यामुळे उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 43 लोकांचा जीव गेला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. उन्नाव जिल्ह्यात 8 आणि कन्नोजमध्ये 5 लोकांचा जीव गेला आहे. तसेच लखनऊ शहरात घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात 6 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.     

शनिवारी रात्री बहुआ भागात धूळीचे वादळ आले होते. वादळामुळे एक कच्चे घरे पडले आहे. यात एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुसुम्भी गावातही घर पडल्याने एका 60 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. घर पडले त्यावेळी हा व्यक्ती घरात झोपला होता, अशी माहिती ललौली पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासात मुसळधार पावसासह वादळाची सूचना रविवारी दिली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असणार असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT