cockfight 
देश

हयगय नाही! हत्येप्रकरणी कोंबड्याला झाली अटक; कोर्टात होणार सादर

सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : तेलंगणामध्ये एक जगावेगळी घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळेच हैराण आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात एका कोंबड्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील. या ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजी लढवल्या जात होत्या. या दरम्यानच कोंबड्याने त्याच्या मालकावरच म्हणजेच 45 वर्षीय सतीश यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका खतरनाक होता की त्यामध्ये सतीश यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेलं. या प्रकरणी पोलिसांनी या हल्लेखोर कोंबड्याला अटक केली आहे. 

असा झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, जगतियाल जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने कॉक फाईट अर्थात कोंबड्यांच्या झुंजी लढवल्या जात होत्या. यादरम्यानच एका कोंबड्याच्या पायाला चाकू बांधला होता. हा कोंबडा पळून जात होता. त्याला पुन्हा झुंजीत उतरवण्यासाठी सतीश प्रयत्न करु लागले. या झुंजीदरम्यानच्या झटापटीत हा चाकू सतीश यांच्या कंबरेखाली लागला. ज्या ठिकाणी हा चाकू लागला त्याठिकाणी त्यांना गंभीर जखम झाली. त्यानंतर त्याठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं मात्र त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आलं. देशात 1960 मध्येच कॉक फाईट अर्थात कोंबड्यांच्या झुंजींवर बंदी आहे मात्र तरीही लोकांकडून याचे आयोजन केले जाते. 

कोर्टात होणार सादर
या घटनेनंतर पोलिसांनी या कोंबड्याला जप्त करत गोलापल्ला ठाण्यात नेलं. तिथे त्याला कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. या कोंबड्यांची देखभाल सध्या पोलिस कर्मचारी करत आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या कोंबड्याला ताब्यात अथवा अटक  केली गेली नाहीये मात्र, सध्या हा कोंबडा पोलिसांकडे आहे. या कोंबड्याच्या खाण्यापिण्याची सोय पोलिसांकडून करण्यात आली आहे. या कोंबड्याला आता कोर्टासमोर सादर केलं जाईल आणि पुढील कारवाई पार पडेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT