Earthquake esakal
देश

Earthquake: जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं, 24 तासांत 5 वेळा भूकंप

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 24 तासांत सौम्य तीव्रतेचे 5 भूकंप

धनश्री ओतारी

जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं. २४ तासांत ५ वेळा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 24 तासांत सौम्य तीव्रतेचे 5 भूकंप आले. त्यापैकी 4.5 तीव्रतेचा भूकंप सर्वात मोठा होता. 5 earthquakes hit Jammu and Kashmir and Ladakh in 24 hours

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी 2 वाजून 03 मिनिटांनी 3.0 तीव्रतेच्या भूकंपानंतर पहिला हादरा जाणवला. कटरा येथे रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी होती. आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. कटरा येथे 11 किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ईशान्य लेहमधील या भूकंपाचीतीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंप दुपारी 2.16 वाजता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

याआधी शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी 2.03 वाजता झालेल्या 3.0 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Verdict : माधुरी हत्तीचं पुढं काय झालं? अनेकांना प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Nepal Crisis: नेपाळमधील हिंसाचारामुळे भारतीय कंपन्यांना फटका; डाबर- ब्रिटानियाचे उत्पादन ठप्प

Lonand Crime: 'लोणंदमध्ये दोन सराईत जेरबंद'; चार लाख सात हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

‘रंगीला’पुन्हा पडद्यावर! उर्मिला-अमिरचा क्लासिक लव्हस्टोरी परत अनुभवता येणार, 'या' दिवशी रीरिलीज होणार सिनेमा

Guardian Minister Chandrakant Patil: महायुतीचा महापौर होण्यासाठी परिश्रम घ्यावेत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील; आगामी काळात जबाबदाऱ्या मिळतील

SCROLL FOR NEXT