Javkhede Khalsa murder case Attention to Northern Investigation Report  esakal
देश

दोन वर्षीय चिमुकलीसह कुटुंबातील ५ जणांची निर्घुण हत्या, घरही पेटवले

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ही घटना प्रयागराजमधील तरवाईच्या खैवाजपूर गावातील आहे. जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये दाम्पत्यासह त्यांची मुलगी, सून आणि 2 वर्षांची नात यांचा समावेश आहे. सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्यात आले.

हा गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली. घरातून धूर निघत असल्याचे पाहून ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये राम कुमार यादव (55), त्यांची पत्नी कुसुम देवी (52), मुलगी मनीषा (25), सून सविता (27) आणि नात मीनाक्षी (2) यांचा समावेश आहे. तर दुसरी नात साक्षी (५) जिवंत सापडली आहे. हत्या कोणी व का केल्या याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

सध्या प्रयागराजचे डीएम आणि एसएसपी आणि इतर पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार डोक्यावर काठीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मुलीवर बलात्कार झाल्याच्या शक्यतेवर पोलिसांनी पोस्टमार्टमनंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार असल्याचे सांगितले. याआधी १६ एप्रिलला अशाच एका घटनेत प्रीती तिवारी (३८) आणि तिच्या तीन मुली माही (१२), पिहू (८) आणि कुहू (३) यांची प्रयागराजमधील नवाबगंजमधील खगलपूर गावात गळा चिरून हत्या करण्यात आली होती, तर पती राहुल तिवारी (४२) लटकलेले आढळले होते.

दरम्यान घरामध्ये सर्वांचे मृतदेह पडलेले आढळून आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यामध्ये या घटनेसाठी सासरच्या मंडळींना जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. राहुल हा मूळ कौशांबीच्या भादवा गावचा असून. सुमारे अडीच महिन्यांपासून तो खगलपूर येथे भाड्याच्या घरात पत्नी व मुलींसह राहत होता. 16 एप्रिल रोजी सकाळी बराच वेळ कुटुंब न दिसल्याने शेजाऱ्यांनी फोन केला असता त्यांना राहुल अंगणात फासावर लटकलेला दिसला.

आवाजाने ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी आत जाऊन पाहिले असता खोलीत प्रीती व तीन मुलींचे रक्ताळलेले मृतदेह पडलेले होते. तपासादरम्यान प्रीती आणि तिन्ही निष्पापांचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांना घरातूनच दोन पानांची सुसाईड नोट सापडली. यामध्ये सासरच्या पक्षातील एकूण 11 जणांची नावे लिहिली असून, त्यांच्यावर छळ केल्याचा आरोप आहे. या लोकांच्या त्रासाला कंटाळूनच मी हे पाऊल उचलत असल्याचंही लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Latest Marathi News Live Update : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Ajit Pawar : 'मिनी भारत' ओझरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आवाहन

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

SCROLL FOR NEXT