Rafale_deal.jpg 
देश

राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल; जाणून घ्या खास वैशिष्ठे

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली- सात हजार किलोमीटरचं अंतर कापून पाच राफेल विमाने आज भारतात पोहोचली. फ्रान्समधून उड्डान केलेली राफेल लढाऊ विमाने दुपारी हरियाणातील अंबाला येथे उतरली. हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया विमानांच्या आगमनावेळी अंबाला हवाई तळावर उपस्थित आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी तब्बल 59,000 करोड रुपयांचा करार करण्यात आला होता. त्यानुसार पहिली पाच राफेल विमाने हवाईदलाच्या ताफ्यात आज दाखल झाली आहेत. राफेल विमाने भारतीय लष्करासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

सोन्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ; वाचा सविस्तर बातमी
विमानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंबाला येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हवाईतळाच्या आजपासच्या चार गावात कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमन्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांना घराच्या गच्चीवर जमा होणे, फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हलाई तळाच्या 3 किलोमीटरच्या परिसरात ड्रोन दिसल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. संध्याकाळी जळत्या मेणबत्या हातात घेऊन राफेलचे स्वागत करण्याचे आवाहन स्थानिक आमदाराने केले आहे.

राफेल विमानांनी फ्रान्सच्या मारिग्नाक हवाई तळावरुन उड्डान केले. त्यानंतर विमानांनी 30 हजार फूट उंचीवर हवतेच पुन्हा इंधन फरले. इंधन भरतानाची नेत्रदिपक फोटो भारतीय हवाई दलाने काल पोस्ट केली होती. राफेल विमानांनी संयुक्त अरब अमिराती येथे एकमेव थांबा घेतला. त्यानंतर राफेल विमाने आज भारतात दाखल झाली आहेत. 

भारतात झपाट्याने वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या; जाणून घ्या सद्यस्थिती!
भारताने फ्रान्ससोबत 36 विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 विमाने भारतात दाखल झाली आहेत. आतापर्यंत 12 लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले असून आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 10 राफेल लढाऊ विमाने देण्यात येणार होती. पण अन्य विमाने तयार नसल्यामुळे सध्या 5 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत.  2 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात 10 ऐवजी 5 विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. 

राफेलची लढाऊ क्षमता

चीनकडे असणारे जे-20 लढाऊ विमानही राफेल सारखेच शक्तीशाली आहे. मात्र, राफेल आणि एसयू-30 एकत्र आल्यास चीन हतबल होऊ शकतो. राफेलमध्ये दोन इंजिन आहेत. तसेच वैमानीकासाठी एक सिट आहे. राफेलचे वजन 24,500 किलो असून याची रेंज 3,700 किलोमीटरपर्यंतची आहे. राफेल विमान 2130 किलोमीटर प्रती तास वेग गाठू शकतो. विमानात MICE हवाईतून हवेत मारा करणारे मिसाईल आहे. तसेच स्कल्प क्रुज मिसाईल विमानावर असून त्याची रेंज 300 किलोमीटरची आहे. एकाच वेळी सहा लक्ष्यांवर निशाणा लावू शकणारे हैमर मिसाईलही यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

Nashik News : एकाचवेळी जीएसटी, आयटीआर आणि ऑडिट: करदात्यांसमोर मोठे संकट

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

पोलिसांचा धक्कादायक कारनामा समोर; ट्रक थांबवण्यासाठी केली दगडफेक; नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT