देश

मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

नामदेव कुंभार

कोरोना विषाणूनं दुसऱ्या लाटेत देशातील एकूण लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के लोकांना पुन्हा संक्रमित केलं आहे. ज्यांनी पहिल्या लाटेत कोरोनावर मात केली होती. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहा:कार माजवला होता. बेड, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवड्यामुळे अनेकांचा जीव गेला होता. पण मागील काही दिवसांपासून दुसरी लाट आटोक्यात आल्याचं चित्र आहे. पण तिसऱ्या लाटेची धाकधूक अनेकांच्या मनात कायम आहे. काही तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे.

एनटीएजीआय कोविड -19 च्या कार्यकारी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के अरोरा यांनी नुकतीच आऊटलूकला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण फक्त एक टक्के आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला होता. या शहरात कोरोना प्रादुर्भाव इतका होता की तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे.

प्रसिद्ध महामारी तज्ज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले की, "देशात सध्या असलेल्या कोरोना स्ट्रेनने अनेकांना संक्रमित कें आहे. या सर्वांमध्ये एन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी जाणवतोय. जोपर्यंत कोरोना स्ट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल होत नाही, अथवा कोरोनाचा नवीन स्ट्रेन येत नाही, तोपर्यंत कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता नाही."

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आईपीएचए) चे अध्यक्ष डॉ संजय रॉय म्हणाले की, 'कोणत्याही लाटेमध्ये अतिसंवेदनशील होस्ट, विषाणू आणि वातावरण या तीन गोष्टी महत्वाच्या असतात.' विषाणूनं आपलं रुप बदललं तसेच लोकांनी नियमांचं पालन न केल्यामुळे दुसरी लाट आली, असेही रॉय म्हणाले.

एका संशोधनानुसार राजधानी दिल्लीमधील जवळपास 70 टक्के लोक याआधी कोरोना संक्रमित झालेले आहेत. ही संख्या जास्तही असू शकते. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू म्युटेट झाल्याशिवाय अथवा नवीन स्ट्रेन आल्याशिवाय तिसऱ्या लाटेची शक्यता नाही, असं रॉय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Killed Accident : धक्कादायक! कोल्हापूरचे चार तरूण रत्नागिरीला फिरायला गेले अन्,झाला भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात!

Latest Marathi News Live Update : शिंदेंची शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी; AQI 375 वर पोहोचला

नवऱ्याच्या अफेअरची कुणकुण; पत्नीकडून हॉटेल रूममध्ये रंगेहात पकडले गेलेले कमल हासन; अभिनेत्रीचं नाव ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT