Rajasthan Politics News  esakal
देश

Rajasthan : सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50 कोटींची ऑफर; गेहलोतांचा पायलटांवर गंभीर आरोप

सोनिया गांधींसोबतच्या भेटीत गेहलोत यांनी पायलटांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोनिया गांधींसोबतच्या भेटीत गेहलोत यांनी पायलटांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Rajasthan Politics News : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची (Sonia Gandhi) भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सोनियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माफीही मागितली आणि अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

गेहलोत सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा ते सर्व तयारीनिशी गेले होते, असं बोललं जातंय. गेहलोत यांनी एक चिठ्ठी तयार केली होती, जी सोनिया गांधींकडं सादर केली. त्यानंतर ते मीडियासमोर येत माफी मागितली. मल्याळ मनोरमाचे फोटोग्राफर जे सुरेश यांनी एक छायाचित्र टिपलं आहे, त्या छायाचित्रात गेहलोतांच्या हातात एक चिठ्ठी दिसत असून ती चिठ्ठी सोनिया गांधींकडं सादर केल्याचं सांगितलं जात आहे.

गेहलोतांच्या हातात असलेली ती चिठ्ठी प्रतिस्पर्धी सचिन पायलटांविरुद्धचं आरोपपत्र असल्याचं फोटोवरून स्पष्ट दिसत आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी अशोक गेहलोत दिल्लीत आले होते, असं बोललं जात आहे.

आमदारांना 10-50 कोटींची ऑफर

सोनिया गांधींसोबतच्या भेटीत गेहलोत यांनी पायलटांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सपा + 18 विरुद्ध 102 आमदारांचा पाठिंबा, असं सूचित करतं की पायलट काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. पायलट यांनी राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत कट रचल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला आहे. यासाठी आमदारांना 10-50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT