Accident News Esakal
देश

Accident News: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटल्याने सहा जणांचा मृत्यू, तर...

धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्यामुळे अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला असुन तीन मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

किश्तवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ घडली आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटल्यामुळे अपघात झाला आहे. हा अपघात सकाळी 8.35 च्या सुमारास झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

अपघात झाला तो परिसर अतिशय दुर्गम आणि जिल्हा मुख्यालयापासून दूर अंतरावर आहे. मदत कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्व मजूर स्थानिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डंगदुरु प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत किश्तवाडचे डीसी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT