Accident News Esakal
देश

Accident News: वाढदिवस ठरला 'काळ'! सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; अपघातात 6 मित्रांचा जागीच मृत्यू

मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना काळाचा घाला

सकाळ डिजिटल टीम

हरियाणातील फरिदाबाद येथे एक भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतून कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. मृत्युमुखी पडलेले सर्व तरुण हे पलवल येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.  हरियाणातील फरिदाबाद येथे गुरुवारी (२ फेब्रुवारी) रात्री हा भीषण अपघात झाला.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळावरून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी फरिदाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुनीत, जतिन, आकाश, संदीप, बलजीत आणि विशाल हे कारमध्ये बसून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुडगावला गेले होते.

वाढदिवस साजरा करून सर्वजण रात्री उशिरा आपापल्या घरी परतत होते. त्यावेळी अचानक गुरुग्राम - फरीदाबाद रस्त्यावरील पाली गावाजवळ पोहोचल्यावर त्यांची कार एका डंपरला धडकली आणि भीषण अपघात झाला. कार आणि डंपर यांच्यातील ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सहा तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

तर समोरासमोर झालेल्या या धडकेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे. धडकेनंतर कारचे तुकडे सर्वत्र उडून रस्त्यावर पडले. सर्व मृतांचे वय 24 ते 30 वर्षांच्या दरम्यानचे आहे. या प्रकरणी पोलीस सध्या कायदेशीर कारवाई करत आहेत. दरम्यान सर्व तरुण मुलांच्या जाण्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT