62 yr old delhi doctor shoots woman dead over affair then kills himself
62 yr old delhi doctor shoots woman dead over affair then kills himself 
देश

डॉक्टर प्रियकर अन् प्रेयसी मोटारीत भेटले अन्...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62 वर्षीय डॉक्टरने 55 वर्षीय प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली व स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागात मोटारीच्या आत रक्ताने माखलेले दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोटारीत डॉक्टर आणि त्याच्या महिला मैत्रिणीचा मृतदेह आढळला. गोळी घालून या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मोटारीमध्ये परवानाधारक पिस्तूलही आढळून आहे आहे. डॉक्टरचे नाव ओमप्रकाश कुकरेजा (वय 62) असून, सुदीप्ता दत्ता मुखर्जी (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

रोहिणीमध्येच सुदीप्ता मुखर्जी यांचे निर्वाण नावाचे एक नर्सिंग होम असून, त्या एमडी होत्या. ओमप्रकाश कुकरेजा त्याच नर्सिंग होममध्ये डॉक्टर होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. सुदीप्ता मुखर्जी या ओमप्रकाश यांच्याकडे विवाहाची मागणी करत होत्या. ओमप्रकाश हे विवाहित असून, यांच्या पत्नी दिव्यांग आहेत. यामधून बाचाबाची होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT