Amit Shaha esakal
देश

"N फॉर 'नसीमुद्दीन..."; अमित शहांनी सांगितला NIZAM चा अर्थ

योगी सरकारमध्ये दंगलखोर डोळे वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नाहीत.

निनाद कुलकर्णी

मुरादाबाद : आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठीचे (Uttar Pradesh Assembly Election 2022) राजकारण आता मोठ्या प्रमाणात तापू लागले असून, योगी सरकारमध्ये (Yogi Government) दंगलखोर डोळे वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नाहीत, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी केले आहे. ते मुरादाबाद येथील ओयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात 700 दंगली झाल्याचा आरोपही केला. यावेळी त्यांनी निझाम या नावाचा अर्थदेखील समजावून सांगितला. (Union Home Minister Amit Shah Public Rally In Moradabad)

शहा म्हणाले की, 'निझाम' (NIZAM) म्हणजे राज्यकारभार पण अखिलेश यादवांसाठी N म्हणजे 'नसीमुद्दीन' I म्हणजे 'इमरान मसूद', Z A म्हणजे 'आझम खान' आणि M म्हणजे 'मुख्तार अन्सारी' असे आहे. त्यामुळे तुम्हाला अखिलेशचा निजाम हवा आहे की, योगी-मोदींचा विकास निजाम? हवा आहे असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. (Akhilesh Yadav)

UP मध्ये सपाने (Samajwadi Party) स्वतःची प्रयोगशाळा (LAB) चालवली. L कडून लुटले, अंतर वाल्यांनी पोते भरले, A म्हणजे दहशतवाद पसरवला असे शहा यांनी सांगत सपा सरकार असताना किती वीज (Electricity) यायची. या सपाच्या लोकांनी बिजली राणीलाही पळवून नेले, आज सत्ता राणी आणण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. पश्चिम उत्तर प्रदेश हा संपूर्ण उसाचा प्रदेश आहे. त्यांना त्याचे नावही माहीत नाही. फक्त जिना, जिना, जिना हे करतात.

अखिलेश यांनी युपीला रक्तबंबाळ केले

रामभक्तांवर गोळीबार कोणी केला हे तुम्हाला आठवत नाही, तो समाजवादी पक्ष होता, असे शाह म्हणाले. मला अखिलेशजींना विचारायचे आहे की, तुमच्या राजवटीत किती दंगली (Riots In Akhilesh Government )झाल्या, याचा हिशेब उत्तर प्रदेशचे लोक मागतात? सातशेहून अधिक दंगली झाल्या. पश्चिम उत्तर प्रदेश रक्तबंबाळ झाला होता. योगी सरकारमध्ये दंगलखोरांची डोळे वर काढण्याची हिंमत नसल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT