गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षा रक्षकांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. यासाठी विविध सुरक्षा दलांमधील सुमारे ७०,००० पोलिसांचा समावेश असणार आहे. यंदाच्या गुजरातच्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकासाठी भाजप आणि मोदींसाही ही लिटमस टेस्ट असणार आहे. (70000 personnel CAPF BSF CRPF will be deployed for Gujarat Assembly Elections)
एएनआयच्या वृत्तानुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सेन्ट्रलगुजरात आर्म्ड पोलीस फोर्सच्या (CAPF) जवळपास ७०० कंपन्या तैनात असणार आहेत. यामध्ये एकूण ७०,००० सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPFs) प्रत्येकी १५० कंपन्यांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, १८२ जागांसाठी होणारी गुजरात विधानसभा निवडणूक १ आणि ५ डिसेंबरलाला दोन टप्प्यात होणार आहे. तर ८ डिसेंबर २०२२ ला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी याच दिवशी पार पडणार आहे. मागच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजप ९९ जागांसह पहिल्या स्थानावर होता. तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. अपक्षांकडे तीन जागा, भारतीय ट्रायबल पार्टी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता.
यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये प्रामुख्यानं ही निवडणूक होणार आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.